नोव्हेंबर महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचे फूल कोणते ?

आपल्याकडे प्रत्येक आडनावासोबत किंवा त्या कु़ळासोबत एका वनस्पतीचे नाव जोडलेले असते.पण हे फक्त भारतातच ! बाकीच्या देशांमध्ये असे काही नसल्याने त्यांनी प्रत्येक फुलासोबत एकेक महिना जोडलेला आहे. म्हणजे एखाद्याचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला असेल तर त्याचे फूल झेंडू आणि झेंडूसोबत त्याचे गुण विशेष पण सांगीतले जातात. झेंडू हे लालित्याचे, भक्तिचे प्रतिक समजले जाते.असे म्हणतात की एखाद्या महिन्यासोबत फुलाचे नाव जोडण्याची प्रथा रोमन लोकांनी सुरु केली. नैसर्गिक अविष्काराचे कौतुक करण्याची ही पध्दत आहे. आजच्या लेखात अशा 'बर्थ फ्लॉवर' आणि त्याच्या स्वभावाबद्दल वाचूया.

सध्या नोव्हेंबर महिना सुरु आहे.आपल्या मराठी वर्षांच्या महिन्याप्रमाणे अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने साधारण याच इंग्रजी महिन्यांच्या सोबत येतात. योगायोग असा की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ज्या फुलांचे प्रतिनिधित्व करतात तीच फुले अश्विन आणि कार्तिक या मराठी महिन्यातल्या बहुतेक सणांत वापरली जातात.
झेंडू आणि शेवंती मराठीत, तर मेरीगोल्ड आणि क्रिसेंथीमम इंग्रजीत!

ऑक्टोबरचे मेरीगोल्ड म्हणजे झेंडू माया-ममता, सर्वस्व वाहून देण्याची भावना याचे प्रतिक समजले जाते आणि  नोव्हेंबर महिन्याचे क्रिसेंथीमम म्हणजे शेवंती-दोस्ती, आनंद, निर्व्याज प्रेम याचे प्रतिक समजले जाते.

सबस्क्राईब करा

* indicates required