computer

ओळख जिल्ह्यांची: जुन्या पेठांपासून ते नरनाळा महोत्सवापर्यंत अकोला शहरात काय काय दडलं आहे....

१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार तसेच अकोला आणि वाशीम असे नविन जिल्हे निर्माण करण्यात आले. अकोला हा जिल्हा मात्र महाराष्ट्र स्थापनेपासूनच स्वतंत्र जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याआधी अकोला मुंबई प्रांताचा भाग होते. अकोला प्रशासकीय दृष्ट्या ६० वर्षे जुना असला तरी महाराष्ट्राच्या पूर्वेकडील या जिल्ह्याचा इतिहास मात्र मोठा आहे.

निजामाच्या ताब्यात असणाऱ्या हैदराबाद संस्थानात जो प्रदेश येत होता. त्यात अकोला देखील होता. अकोला जिल्ह्याची नावाबद्दल प्रचलित असलेली कथा म्हणजे अकोलसिंग नावाच्या एका सरदाराने हे शहर वसवले म्हणून याला अकोला नाव पडले.

अकोला जिल्ह्यात तशा अनेक नद्या वाहतात. काटेपूर्णा, मोरणा, उमा, शहानुर, वान या नद्यांचा इथे उल्लेख करता येईल. या सर्व नद्यांवर धरणे बांधण्यात आलेली आहेत. तसे असले तरी अकोला जिल्ह्याची ओळख मात्र तापी पूर्णा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले शहर अशीच आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये अकोला शहरात पण जुन्या पेठा आहेत. हरिहरपेठ, जठार पेठ, रामदासपेठ अशा जुन्या पेठा शहरात आहेत. हरिहरपेठ येथे असलेले पुरातन विठ्ठल मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. सध्या सगळीकडेच शहरीकरणाचा जोर वाढल्याने अकोला देखील त्याला अपवाद नाही. अकोला शहराची वाढ झपाट्याने होत आहे. येथील सोन्याच्या, गुरांच्या तसेच कापसाच्या बाजारपेठा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पण प्रसिद्ध आहेत.

ज्वारी पिकात तर अकोल्याचा राज्यात पहिला क्रमांक लागतो. अकोल्यात असलेले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. महाबीज आणि महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ अशा संस्था पण इथे असल्याने या जिल्ह्याची वेगळी ओळख तयार झाली आहे.

पर्यटनाच्या बाबतीत अकोला जिल्हा उजवा आहे. नरनाळा, बाळापूर, असदगड असे किल्ले इथे आहेत. नरनाळा किल्ला आणि सोबतच नरनाळा अभयारण्य यामुळे अकोल्याच्या वैभवात मोठी भर पडते. नरनाळ्याला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून नरनाळा महोत्सव सुरु केला आहे.

अकोल्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दल म्हणायचे तर अकोल्यात काही पदार्थ प्रसिद्ध आहेत. पुरण पोळी, मोदक, बदाम हलवा, चकली, करंजी यांचा त्यात समावेश करता येईल. एका अर्थाने मराठी खाद्यसंस्कृतीचे प्रतिबिंब अकोल्यात पण दिसते.

काटेपुर्णा अभयारण्य आणि धरण देखील लोकप्रिय आहे. तर गजानन महाराजांचे शेगाव येथून जवळच आहे. येथे राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. तर पातूरच्या रेणुका मातेवर भक्तांची मोठी श्रद्धा आहे.

तर ही होती अकोला जिल्ह्याची माहिती. ही माहिती तुम्हाला आवडल्यास जास्तीतजास्त शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required