माहीत आहे, कसं घडलं जमशेदपूर ? वाचा १०३ वर्षांपूर्वी काय घडलं तिथे !

भारतातील स्वदेशी उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांनी १८८० साली स्टील उद्योग उभारण्याची कल्पना मांडली. जमशेदजी सेंट पिट्सबर्ग मध्ये असताना भूगर्भशास्त्री ‘चार्ल्स पेज पेरिन’ यांनी साक्ची हे गाव स्टील उद्योगासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यानंतर १९०८ साली 46632 रुपयांमध्ये टाटांनी साक्ची आणि आसपासचा 3584 एकर जमीन विकत घेतली आणि तिथे स्टील कंपनीची सुरुवात केली.

२ जानेवारी १९१९ आली तत्कालीन वायसरॉय ‘लॉर्ड चैम्सफोर्ड’ साक्ची येथे आले त्यावेळी त्यांनी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या स्मृतीपित्यार्थ साक्चीचे नाव बदलून ‘जमशेदपूर’ असे ठेवले तसेच ‘कालीमाटी’ रेल्वे स्टेशनचे नाव बदलून टाटानगर करण्यात आले. या नामकरणाला या वर्षी १०३ वर्ष पूर्ण होत आहेत.

बोभाटाच्या हाती लागलेल्या ‘Iron and steel in india’ या दुर्मिळ पुस्तकात या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. साक्चीचा जंगली प्रदेश आणि छोट्याश्या गाव वजा परिसराचा कायापालट होत तिथे टाटा स्टील कंपनी कशी उभी राहिली याचाच लेखाजोखा यात दिला आहे.

भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान असलेल्या या महान उद्योजकाला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required