मिळवा IRCTC युझर्सचा डेटा आता फक्त १५,०००रूपयांत

रोज लाखो लोक IRCTC च्या वेबसाईटला भेट देतात. सुट्यांच्या वेळेस तर हे प्रमाण खूप वाढते. आता परिस्थिती थोडी बदललीय पण अगदी गेल्यावर्षीपर्यंत IRCTC वर तात्काळमध्ये तिकिट बुक करणं मुश्किल असायचं.  इतकं लोकांचं प्रचंड ट्राफिक असणार्‍या वेबसाईटचा डेटा चोरीला गेलाय. 

आठवा बरं आपलं IRCTCवर अकाऊंट काढताना आपण काय काय माहिती दिलीय? नांव, मोबाईल नंबर , पॅन क्रमांक, आपल्या प्रवासाचे तपशील, तिकिटावरच्या प्रत्येक माणसाच्या ओळखपत्राची माहिती. एक करोडहून अधिक लोकांच्या माहितीचा हा सारा इ-ऐवज आता हॅकर्सच्या हाती पडलाय. आणि ते प्रत्येक सीडीमागे १५००० रूपये आकार घेऊन हा डेटा विकत आहेत. 

महाराष्ट्र सरकार या प्रकरणाच्या मुळाशी जायचा प्रयत्न करत आहे आणि अजूनतरी रेल्वेने या वृत्ताचा इन्कार केला आहे. 

वृत्त: टाईम्स ऑफ इंडिया

सबस्क्राईब करा

* indicates required