computer

२०२१ मधले युट्यूबवरचे टॉप पाच ट्रेडिंग व्हिडिओ, सिरीज आणि कंटेट क्रिएटर्स!! यातलं तुम्ही काय काय पाह्यलंय?

वर्ष संपत चालले आहे. २०२१ च्या या शेवटच्या महिन्यात वर्षभरातील अनेक घटनांचा लेखाजोखा मांडला जाईल. गुगल प्ले, स्पॉटिफाय यासारख्या कंपन्या वर्षभरात ट्रेंडिंगवर असणाऱ्या गोष्टी समोर आणत असतात. युट्यूबनेही यावर्षी सर्वात जास्त ट्रेडिंग व्हिडिओ आणि इतर गोष्टींची यादी समोर आणली आहे.

भारतातील टॉप ५ व्हिडिओ

पहिल्या क्रमांकावर 'झोम्बी द लिविंग डेड' हा राऊंड टू हेल यांनी बनवलेला व्हिडिओ आहे. या व्हिडिओतला विचित्र मेकअप झोम्बी बघून अनेकांचे तुफान मनोरंजन झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर एक विनोदी व्हिडिओ आहे. 'पागल बेटा १३' हे त्या व्हिडिओचे नाव. हा भन्नाट कॉमेडी व्हिडीओ बनवला होता सीएस बिष्ट वाईन्सने. हा सर्वसामान्य घरात घडणाऱ्या गोष्टींवर आधारित ॲनिमेटेड व्हिडिओ होता.

अस्पायरंट ही यु ट्यूबवर रिलीज झालेली सिरीज चांगलीच गाजली आहे. या सिरीजचा पहिला एपिसोड 'ऑप्शनल मे क्या है' हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुम्ही या यादीत कॅरीमिनाटीला शोधत असाल तर तो पठ्ठ्या पण या यादीत आहे बरंका!! गेल्या वर्षीपासून तो जणू युट्यूबचा किंग झालाय. त्याचा 'द लँड ऑफ बिग बॉस' हा व्हिडिओ ४ थ्या क्रमांकावर आहे. ५ व्या क्रमांकावर 'फ्री फायर वर्ल्ड सिरीज २०२१ सिंगापूर फायनल्स' हा व्हिडिओ आहे.

यात टॉपचे कंटेंट क्रिएटर्स कोण आहेत हे ही जाणून घ्या.

गेमिंगवाल्यांनी यावर्षीचे सर्व मार्केट खाल्ले आहे. दिवसेंदिवस गेमिंग हे क्षेत्र वाढत आहे. पोरं अक्षरशः तासंतास फक्त गेम खेळत नाहीत, तर दिवस-दिवसभर लाईव्ह स्ट्रीमिंग बघत बसतात. याचमुळे टोटल गेमिंग आणि टेक्नोगेमर्स हे यांनी पहिले दोन क्रमांक पटकावले आहेत.

जेकेके इंटरटेनमेंट तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर क्रेझी एक्सवायझेड चौथ्या क्रमांकावर आहे. यु ट्यूबने रिलीज केलेल्या डेटानुसार हरप्रित एसडीसी, ऍडीटेक, द वायरल फिव्हर, फॅमिली फिटनेस, आणि स्टार गेमर्स हे टॉपचे ब्रेकआऊट क्रिएटर्स ठरले आहेत.

यावर्षी वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे लोकांचा वेळ अधिकाधिक प्रमाणात युट्यूबसारख्या माध्यमांवर खर्च होत होता. याचा फायदा म्हणून अनेक क्रिएटर्सच्या व्ह्यूव्हरशिपमध्ये घसघशीत वाढ झाली आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required