जाहिरात असो वा सिनेमा आमीर नेहमीच हटके आहे बॉस !!!

Subscribe to Bobhata

सिनेमा असो वा जाहिरात किंवा छोट्या पडद्यावर झळकणं असो अमीर नेहमीच तगडा विषय निवडतो. सत्यमेव जयते, पिके, दंगल अशी काही मागच्या काळातली उदाहरणं देता येतील. आता हा दंगलचा सुपरस्टार स्टार प्लसच्या ‘नयी सोच’ या जाहिरात मालिकेतून पडद्यावर झळकताना दिसत आहे पण इथेसुद्धा विषय हटके आहे बरं का.

या जाहिरातीत अमीर एका मिठाईवाल्याचा रोल करतांना आपल्याला दिसत आहे. त्याचं आणि एका ग्राहकाच्या बोलण्यातून हि गोष्ट पुढे सरकत जाते. मिठाईच्या दुकानाच्या यशाबद्दल बोलत असता समाजाच्या चौकटी पार करून एक नवी दिशा दाखवण्याचं काम हि जाहिरात करते.

स्त्री पुरुष समानतेवर भाष्य करणारी हि जाहिरात समाजात असमानता पसरवणाऱ्यांसाठी मोठाच संदेश देऊन जाते.

इथे जाहिरातीबद्दल जास्त काही न सांगता तुम्हीच हि जाहिरात बघा आणि विचार करा.

सबस्क्राईब करा

* indicates required