हे बघा बॉलीवूडमधल्या मायलेकांच्या वयातलं खरं अंतर : आता तर बॉलीवूडवरचा विश्वासच उडाला राव!

बॉलीवूडच्या चित्रपटात वास्तवाला धरून कधी काही घडत नसतं. आणि लोकांच्या प्रत्यक्ष जीवनपद्धतीशी तर त्याचा काडीचाही संबंध नसतो. ठासुन भरलेल्या मारामाऱ्या, आंबटगोड गाणी, मसालेदार डायलॉग्ज आणि हिरोच्या अतिशयोक्त करामती म्हणजे बॉलीवूडचा सिनेमा. आता इथे या फिल्मी मायलेकांच्या जोड्या बघा. दोघांच्या वयातलं वास्तविक अंतर इतकं कमी आहे की कुठल्याही बाजूनं विचार केला तर मायलेक वाटणार नाहीत !!

नमक हलाल चित्रपटात वहिदा रेहमान (१९३८) यांनी अमिताभ बच्चन (१९४२) यांच्या आईची भूमिका केली होती. म्हणजे वहिदा या अमिताभपेक्षा फक्त ४ वर्षांनी मोठ्या आहेत.

दामिनी चित्रपटात रोहिनी हट्टंगडी (१९५१) यांनी ऋषी कपूरच्या (१९५२) आईची भूमिका केली. होती. दोघांच्यात वयात फक्त १ वर्षाचं अंतर आहे.

मैने प्यार किया चित्रपटात रिमा लागू (१९५८) यांनी सलमान खानच्या (१९६५) आईची भूमिका केली होती. रिमा लागू तेव्हा सलमानपेक्षा फक्त ७ वर्षांनी मोठ्या होत्या.

वक्त या सिनेमात शेफाली शाहने (१९७२) अक्षय कुमारच्या आईची भूमिका रंगवली आहे. इथं तर शेफाली अक्षयपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे!

स्त्रोत

किरण खेर (१९५५) यांनी रंग दे बसंती चित्रपटात आमिर खानच्या (१९६५) आईची भूमिका केलीय. दोघांच्या वयात १० वर्षांचा फरक आहे !

स्त्रोत

दबंग मध्ये डिंपल कपाडीया (१९५७) सलमानच्या मातोश्री बनल्या होत्या. दोघांच्या वयात ८ वर्षांचं अंतर आहे!

ओम शांती ओम मध्ये किरण खेर यांनी शाहरुख खानच्या (१९६५) आईची भूमिका केली आहे. म्हणजे इथेही मायलेकांच्यात फक्त १० वर्षांचं अंतर!

स्त्रोत

अलिकडेच आलेल्या हैदर मध्ये तब्बु (१९७१) शाहिद कपुरची (१९८१) आई बनली होती. म्हणजे तब्बु शाहिदपेक्षा फक्त १० वर्षांनी मोठी आहे!

स्त्रोत

बीवी नंबर. 1 मध्ये हिमानी शिवपुरी (१९६०) या सलमानच्या आई होत्या. म्हणजे दोघांच्या वयात फक्त ५ वर्षांचा फरक!

बघितलं का मंडळी? असो, यह बॉलीवूड है आणि यहां सबकुछ चलता है. आणखी एक कटू सत्य म्हणजे इथं विवाहित आणि जाड हिरॉईन्सची गाडी नेहमी टेकाला लागलेली असते. जणू त्यांच्यातला अभिनयगुणच संपलाय !!

संकल्पना : TopYaps

अन्य फोटो युट्यूब वरून साभार

​​​​​​​​​​

सबस्क्राईब करा

* indicates required