आमिर खान - फॅट टू फिट बनण्याची कहाणी

आमिर खानचा दंगल पुढच्या महिन्यात रिलीज होतोय. सिनेमाचे ट्रेलर्स आणि पोस्टर्स पाहिले की महावीर फोगटच्या भूमिकेसाठी आमिरने खूप वाजन वाढवल्याचं दिसतंय. काल त्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ रिलीज केलाय- तो फॅट पासून फिट कसा बनला याचा.

आमिर त्याच्या भूमिकांसाठी अतिशय मेहनत घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. साहजिकच त्यानं जाड होण्यासाठी जाड बॉडीसूट न घालता वजन वाढवलं. पण त्यानं हुशारी ही केली, की महावीरसिंग जाड असतानाच्या प्रसंगांचं शूटिंग आधी करून घेतलं आणि मग त्याच्या बारीक असतानाचे सीन केले. तरीही व्हिडिओ पाहाताना त्याने वजन उतरवण्यासाठी घेतलेली मेहनत खूप आहे हे दिसतंय. इतकंच नाही, तर त्याला हे वजन आणि मुख्य म्हणजे चरबी घटवायला पाच महिने लागले.

आमिर खानसारख्या लोकांच्या पाठीमागे त्यांचे फिटनेस ट्रेनर्स, डाएटिशियन्स ही सगळी फौज असते. त्याहूनही महत्वाचं म्हणजे, त्याला हे करून पैसा मिळतो. आपल्यासारख्या लोकांना व्यायाम केला तरी पोटापाण्यासाठी पुन्हा काहीतरी नोकरी/बिझनेस पण करायला लागतो.  त्यामुळे आता हा व्हिडिओ पाहून तुमच्या जाड नवर्‍यांच्या किंवा मुलांच्या मागे "बघ, तो कसा बारीक झाला. तू पण हो" असा लकडा लावू नका. 

सबस्क्राईब करा

* indicates required