व्हिडिओ : मुलीची छेडछाड करणाऱ्यांना अतिफ अस्लमची चपराक

Subscribe to Bobhata

 या वर्षी ३१ डिसेंबरला  न्यु ईयरच्या पार्टीत बेंगळुरूमध्ये अत्यंत वाईटरित्या महिलांची छेडछाड झाली. या प्रकरणानंतर महिला सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आलाय. आता पाकिस्तानातसुद्धा अशीच काहीशी घटना घडली आहे. "कराची ईट २०१७" नावाच्या या कॉन्सर्टमध्ये स्टेजवर प्रसिद्ध गायक अतिफ अस्लम परफॉर्म करत होता. तेव्हा काही तरुणांनी गर्दीचा गैरफायदा घेत एका तरूणीला त्रास द्यायला सुरुवात केली.  हे बघून अतिफ अस्लमनं या तरूणांना चांगली अक्कल तर शिकवलीच, सोबत अशा पाशवी मनाच्या अनेक राक्षसांना माणसाची औलाद बनण्याचा धडाही दिला. 


   या व्हीडीओत दिसतंय की छेडछाड होताना पाहून अतिफने म्युझिक थांबवून त्या तरूणांना विचारलंय, "तुम्ही कधी मुलगी पाहिलीय का?  तुमची आई किंवा बहिणही इथे असू शकते." अतिफनं यावेळी त्या मुलीला स्टेजवर घेऊन दुसरीकडे पाठवलं आणि लोकांनी त्याला ओरडून प्रोत्साहनपर दादही दिली. 

अतिफचा हा व्हिडीओ व्हायरल तर होतोयच पण सोबत त्याच्या कृतीचं कौतुकही होतंय.

सबस्क्राईब करा

* indicates required