छकुल्याच्या छकुलीचं बारसं...पाहा एकदम मराठमोळं असं काय नांव ठेवलंय ते !!

आपल्या राजकीय नेत्यांसोबत सेलेब्रिटीजसुद्धा सोशल मिडीयावर जाम ऍक्टिव्ह असतात. त्यातलीच एक आहे आपली उर्मिला कानेटकर-कोठारे !!

जर तुम्ही तिला ट्विटरवर फॉलो करत असाल, तर तुम्हांला हे लगेच समजून येईल. महेश कोठारेंच्या या सूनबाईंनी त्यांचं गरोदरपणसुद्धा छान सेलिब्रेट केलं आणि ते क्षण सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या नृत्याच्या प्रॅक्टिस आणि डोहाळेजेवणाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. तर मग कालच पूर्ण कोठारे कुटुंबाने त्यांच्या छकुलीच्या बारशाचे फोटो ट्विट केलेत, ते पाह्यलेत की नाही ?

या छकुलीचं नांव ही एकदम मराठमोळं आहे- जिजा !! या बारशात जिजाला खणाचं परकर-पोलकं तर घातलं होतंच, पण आदिनाथ आणि महेश कोठारेंनीही मस्त भगवे फेटे बांधले होते. अर्थातच उर्मिलाही मराठी पारंपरिक साडी आणि दागिन्यांनी नटली होती. वाचण्यापेक्षा हे फोटो पाहाच मंडळी...

अवांतर-- आम्हांला या बाळाचं कौतुक आहेच हो मंडळी, फक्त येत्या काळात तैमुरसारखे जिजाचे पण शी-शू केल्याचे अपडेट्स वाचावे लागू नये म्हणजे मिळवली..

सबस्क्राईब करा

* indicates required