computer

हे बोईंग ७२० विमान नागपूरच्या विमानतळानी दत्तक घेतलंय का काय ?

लहानपणी तुमच्या शाळेत येण्या जाण्याच्या रस्त्यावर एखादी गाडी नेहेमी पार्क केलेली तुम्हाला दिसत असते. तुम्ही पहीलीत असताना ती गाडी जिथे असते तिथेच तुम्ही  आठवीत आलात तरी आहे तिथेच सडताना दिसते.मग हळूहळू गाडीचा पत्रा गंजतो, टायर नाहीसे होतात, काचा फुटतात.असा अनुभव तुम्हीही घेतला असेल. पण हे झालं एखाद्या गाडीचं .या गाडीच्या जागी एखादं विमान आहे अशी कल्पना केलीत तर तुम्ही थेट नागपूर विमानतळावर जाऊन पोहचाल !

गेली २४ वर्ष एक  Boeing 720  विमान नागपूर विमानतळावर आहे.१९९१ साली एका इमर्जन्सीमुळे हे विमान नागपूरला  उतरवावे लागले होते आणि तेव्हापासून हे विमान तिथेच आहे .ते परत कधी उडालेच नाही.नुकतेच यामागील खरे कारण आता समोर आले आहे. 
क्रॉय यांचे वडील हे विमान भारतात घेऊन आले होते.त्याचे झाले असे की  ख्रिस क्रॉयचे वडील हे ब्राऊन फिल्ड म्युनिसिपल एयरपोर्टवर एयरपोर्ट मेकॅनिक म्हणून काम करत होते.

त्यांना सॅम वेडेर नावाचा एक भारतीय टायर उद्योगपती भेटला.त्यानी  केव्हीन क्रॉय  यांना विमान दुरुस्ती करण्यास सांगितले. खरे म्हणजे हे विमान भंगारातच काढलेले होते.त्यामुळे इतर लोकांनी केव्हीनलला हे विमान दुरुस्त करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे असे सांगून पाहिलं पण तरी क्रॉयच्या वडिलांनी विमान दुरुस्त करण्यास घेतले.

 

सॅमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना फक्त हे विमान सीमा ओलांडून टिजुऍनापर्यंत नेऊन टेस्ट फ्लाईट पूर्ण करायची होती. त्यासाठीचे कागदपत्रांचे काम  केव्हीनच्या बायकोने पूर्ण केले. टेस्ट पूर्ण केल्यावर सॅम आणि केव्हीन क्रॉय  भारताच्या दिशेने उडाले.पण शेवटी बिघाड तो बिघाड अचानक भोवलाच !! विमान पूर्णपणे नादुरुस्त नसल्याने त्यांना ऐनवेळी विमान नागपूर विमानतळावर उतरवावे लागले. 

सॅमला हे विमान लागलीच हलवायचे होते,पण विमानतळ प्राधिकरणापुढे काय त्यांची डाळ शिजली नाही. हे विमान तेव्हापासून तसेच पडून राहिले.त्यानंतर त्यावरचे चार्जेस वाढत गेले आणि सॅम वेडेर पुन्हा फिरकलाच नाही.  

जुनी विमानं आणून त्याच्या जोरावर भारतात विमान कंपन्या उभ्या करण्याचे उद्योग त्या काळात अनेकांनी केले त्यापैकी एक फसलेला प्रयत्न म्हणजे  हे Boeing 720

सबस्क्राईब करा

* indicates required