computer

या १० सेलिब्रिटींचे 'जुळे' बघितले का!!

मंडळी असं म्हणतात की जगाच्या पाठीवर तुमचे ७ जुळे असतात. पण राव, यातल्या एकाला तरी भेटलो तरी भरून पावलो. या बाबत आपले सेलिब्रिटी जाम भाग्यवान आहेत, कारण त्यांचे जुळे लोक त्यांच्यापर्यंत स्वतः चालत येतात.

आज आपण बघुयात आपल्या सेलिब्रिटींचे जुळे.

१. सलमान खान - नझीम खान

हा सलमानचा बॉडी डबल असून अनेक चित्रपटात याने सलमान खानसाठी काम केलं आहे.

२. सचिन तेंडूलकर - बलवीरचंद

आयला! डिट्टो सचिन !!!

३. मनमोहन सिंह - गुर्मीत सिंह सेठी

४. जितेंद्र - शिन

'शिन' या अमेरिकन अभिनेत्याची चेहरेपट्टी आपल्या जितेंद्र बरोबर एकदम  जुळतेय.

वाह भाई वाह!! जुडवा भी फिल्म स्टार निकला!!

५. विरेंद्र सेहवाग - जीवन शर्मा

यातला डुप्लिकेट ओळखून दाखवा राव!!

६. अरबाज खान - रॉजर फेडरर

टेनिस खेळाडू 'रॉजर फेडरर' आपल्या अरबाज सारखाच दिसतो राव!!

७. सैफ अली खान

सिनेमाचा धंदा नीट चालत नाही म्हणून सैफ भाऊ पार्ट टाईम नोकरी करताना सापडले. डुप्लिकेट वगैरे अफवा आहे भौ!!

८. महात्मा गांधी

महात्मा गांधी इथे काय करतायत!!

९. अक्षय कुमार - शॉन मायकल

WWE च्या खेळात याला बघितला असणारच तुम्ही. ९० च्या दशकात शॉन मायकल लाडका होता सगळ्यांचा!!

१०. सोनाक्षी सिन्हा - प्रिया मुखर्जी

शत्रुघ्न तात्यांनी केलेला झोल!!

११. अजव देवगण

अजय भाऊ दहा दिवस उपाशी राहिले तर अशेच दिसतील!!

 

 

तर मंडळी आहेत की नाही सगळे डिट्टो जुडवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required