बोस डेड ऑर अलाईव्ह : नेताजींच्या भूमिकेत राजकुमार राव !

Subscribe to Bobhata

ALT-बालाजीचं प्रोडक्शन असलेला ‘बोस – डेड ऑर अलाईव्ह’ या वेब सिरीजचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. अनपेक्षितरीत्या राजकुमार राव यात मुख्य भूमिकेत म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार रावचे आधीचे सिनेमे पाहता तो या भूमिकेला न्याय देईल याची पूर्ण खात्री आहेच.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला कळतं की ही गोष्ट बोस यांच्या मृत्युपासून सुरु होत आहे. तो काळ म्हणजे १९४५. सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू झाला की नाही? झाला नसेल तर ते कुठे आहेत? झाला असेल तर ते विमान अपघातात मेले की आणखी काही कारणांनी? अशा प्रश्नांभोवती ट्रेलर फिरतोय. ‘महाभारत की लढाई युधिष्टिरने नहीं, अर्जुनने जिती थी’ असे काही खास बालाजी स्टाईल डायलॉग आपल्याला ऐकू येतात. एकंदरीत उत्सुकता ताणून ठेवण्यात ट्रेलर यशस्वी झाला आहे.

वेब सिरीजचा विषय गंभीर आणि एका अशा गोष्टीवर भाष्य करणारा आहे जिच्याभोवतीचं अजूनही गूढ वलय आहे. दिग्दर्शक पुलकितने आणि राजकुमार रावने वेब सिरीजमध्ये जीव ओतून काम केलंय हे ट्रेलरवरून तरी दिसून येतंय. पण बालाजी म्हटलं की एकता कपूर ताई आठवल्याशिवाय राहणार आहे का? बालाजीने तयार केलेले सिनेमे बघता या सिरीजमध्ये थोडी का होईना फिल्मी मसाला असण्याची शक्यता आहे. आता हा एक तर्क झाला, पण हे खरंय का खोटं ते आता सिरीज आल्यावरच कळेल.

सबस्क्राईब करा

* indicates required