computer

या सरत्या वर्षात मावळलेले ७ तारे !

२०१७ हे वर्ष फिल्म इंडस्ट्रीसाठी वाईट वर्ष होतं असं आपण म्हणू शकतो कारण फिल्मी जगतातून अनेक सितारे यावर्षी निखळले. ‘ओम पुरी’, ‘रीमा लागू’, ‘विनोद खन्ना’ आणि परवाच आपल्याला सोडून गेलेले ‘शशी कपूर’. या सर्वांच फिल्म इंडस्ट्री मधलं महत्व वादातीत होतं. एक काळ यांनी गाजवला होता. पण काळापुढे कोणाचंच चाललेलं नाही.

मंडळी आज आपण बघणार आहोत या सरत्या वर्षात मावळलेले ७ तारे.

७. शशी कपूर – ४ डिसेंबर, २०१७

प्रदीर्घ आजारानंतर शशी कपूर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक अफवा उठल्या पण ४ डिसेंबर रोजी आलेली बातमी दुर्दैवाने अफवा नव्हती.

६. टॉम अल्टर – २९ सप्टेंबर, २०१७

टीव्ही सिरीयल, सिनेमा पासून ते नाटकांपर्यंत उत्तम कामगिरी बजावणारे टॉम अल्टर सर्वांच्याच लक्षात राहिले. स्कीन कॅन्सरशी प्रदीर्घ लढ्यानंतर त्याचं निधन झालं.

५. सीताराम पांचाल – १० ऑगस्ट, २०१७

सिनेमात हा चेहरा अनेक छोट्या मोठ्या सिन्स मध्ये दिसायचा. या चेहऱ्याचं नाव जरी माणसांना माहित नसलं तरी सगळेच याला ओळखून होते. या चेहऱ्याला नाव होतं सीताराम पांचाल’. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याचं मृत्यू झाला.

४. इंदर कुमार – २८ जुलै, २०१७

सलमानचा वाँटेड आठवतो का ? सलमानच्या बरोबरीने काम करणारा इंदर कुमार वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. असं म्हणतात की डिप्रेशनमुळे त्याचा जीव गेला.

३. रीमा लागू – २८ मे, २०१७

मराठी इंडस्ट्री बरोबर बॉलीवूड देखील या घटनेने सुन्न झालं. वयाच्या ५८ व्या वर्षी रीमा लागू आपल्याला सोडून गेल्या. अनेक गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी काम केलं. त्याचं जाणं हे सर्वांसाठीच धक्कादायक होतं.

२. विनोद खन्ना – एप्रिल २७, २०१७

बॉलीवूडचा आणखी एक दमदार अभिनेता कॅन्सरमुळे पडद्याआड गेला. वयाच्या ७० व्या वर्षी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

१. ओम पुरी - ६ जानेवारी २०१७

या दुर्दैवी वर्षाची सुरुवात ओम पुरी सारख्या दिग्गज अभिनेत्या पासून झाली हे आणखी एक दुर्दैव म्हणायचं. पॅरलल सिनेमा असो वा मसाला सिनेमा या सगळ्यात ओम पुरींचा अभिनय उजवा असायचा. ६ जानेवारी २०१७ रोजी त्याचं निधन झालं

मंडळी या सगळ्यां महान कलाकारांना बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required