महिलादिनी खास कन्सेटची लावणी - त्याला हो पॉईंट माझा कळंना..

Subscribe to Bobhata

कन्सेट म्हणजे परवानगी. ही वेगवेगळ्या वेळी सारखीच असेल असं नाही. हेच सांगताहेत आपल्याला शकुंतला नगरकर आणि मेघा घाडगे. 

आपल्याला हिंदी सिनेमानं शिकवलंय की "इन्कार में भी इकरार होता है". त्यामुळं मुलींच्या नकारात होकार समजून त्यांना त्रास देणारे जसे असतात, तसाच एखादीचा इशारा न समजणारा प्राणीही असूच शकतो. आणि जरी तिनं प्रेमाला होकार दिला, तरी तिचा सगळ्याच बाबतीत होकार धरून कसा चालणार नाही, हेच  या दोघी या ’कन्सेट’च्या लावणीत एकदम झकासपणे सांगताहेत. 

शकू आणि मेघा दोघी विचारात पडल्या आहेत की आपल्या कन्सेटचा अर्थ नक्की कसा लावला जाईल? "पटकन हो म्हटलं तर म्हणजे मुलगी चालू?", "हो म्हटलं तर गृहित धरलं जाईल?" "लटकं, खोटं-खोटं नाही म्हटलं तर ते खरं धरलं जाईल?" बाप रे बाप!!! केवढे ते प्रश्न..

लावणी म्हणाल तर एकदम आजच्या काळातली आहे. पारंपारिक लावणीचा बाज असला तरी नव्या शब्दांचा आधार घेत एका महत्वाच्या प्रश्नाला हात घालणारी.  टिंडर कोकोनट आणि मराठीसोबतच इंग्रजी शब्दांची सरमिसळ असलेली. 

मेघा: "कधी असतं हो, कधी असतं नाही. कधी आपलं आपल्यालाच समजत नाही"

शकुंतला: "मग म्हणायचं मे बी. ज्याला हे नीट समजलं- तो हिरो. ज्याला नाही समजलं- तो झीरो"

हे  हो, नाही आणि मे बी लोकांना जर नीट समजलं, तर प्रत्येकीला हवा तसा त्यांचा-त्यांचा हिरो एक दिवस नक्की भेटेल. 

शकुंतला नगरकर या प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा आहेत.  मेघा घाडगेला तुम्ही ’पछाडलेला’ आणि इतर सिनेमांत बघितलं असेलच. गौरव गेरा ’चिकना भारी’ म्हणून इथं चांगला शोभलाय.  म्हणून  ही लावणी आपल्यापर्यंत पोचवण्याचं आणि लिहिण्याचं श्रेय जातं सावित्री मेधातुल आणि भूषण कोरगांवकर यांना. 

तर मग बघा, तुमचा पॉईंट कुणाकुणाला कळतो तो..

आणखी वाचा-

शुक्रावरच्या विवरांना दिली आहेत या तीन भारतीय स्त्रियांची नावे-यांतल्या दोघी तर तुम्हांला चांगल्याच माहित आहेत..

बालवधू, हिंदू लेडी ते लोकांवर उपचार करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टरची कहाणी येतेय - डॉक्टर रखमाबाई या सिनेमातून..

या कारणांमुळं इसिसचे अतिरेकी बायकांना घाबरतात!!

या कबड्डीत जी मजा आहे ती प्रो-कबड्डीत नाही..

सुषमा स्वराज बनल्या ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेता

 

सबस्क्राईब करा

* indicates required