भेटा महाराष्ट्राच्या सिक्रेट सुपरस्टारला...आवाज असा की भले भले गायक फिके पडतील राव !!

Subscribe to Bobhata

टॅलेंट जास्त काळ लपून राहत नाही हे ‘संघपाल तायडे’ यांच्याकडे बघून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मंडळी,  संघपाल तायडे हे पोलीस दलात आहेत. पोलीस दलात असले तरी त्यांची आवड काहीशी निराळी आहे. त्यांना सुंदर गाता येतं. आतापर्यंत त्यांचं गाणं ऐकून त्यांचे सहकारी मंत्रमुग्ध व्हायचे पण आता संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या आवाजाने वेड लावलंय.

एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी सुरेल आवाजात ‘खेळ मांडला’ गाताना दिसतोय. व्हिडीओत कोण आहे याचा शोध घेतल्यावर समजलं की हे आहेत जळगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले ‘संघपाल तायडे’.

पोलीस दलातील राजेश पाटील यांनी केवळ मनोरंजन म्हणून ही व्हिडीओ क्लिप बनवली. त्यानंतर ती सोशल मिडीयावर टाकण्यात आली आणि बघता बघता या व्हिडीओला लोकांची पसंती मिळाली. आत्तापर्यंत २० लाख लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. एक गम्मत म्हणून तयार केलेली व्हिडीओ क्लिप एवढी सुसाट पसरेल हे कोणालाही वाटलं नसावं.

सध्या जगभरातून त्यांची वाहवा होत आहे. एवढंच नाही तर त्याचे वरिष्ठदेखील त्यांचा आवाज ऐकून खुश झालेत. मंडळी, या एका क्लिपनंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. फोन, मेसेज, आणि प्रत्यक्ष भेट देणाऱ्या माणसांची त्यांच्याकडे रीघ लागली आहे. यानंतर त्यांच्या आणखी काही व्हिडीओ क्लिप आल्या आणि चर्चा आणखी वाढली.

संघपाल तायडे कोण आहेत ?

संघपाल तायडे हे २००७ पासून पोलीस दलात कार्यरत आहेत. काही काळ त्यांनी ठाण्यात कोन्स्टेबल म्हणून काम केलं. त्यांचे वडील खुशाल तायडे हे ग्रामसेवक म्हणून जळगावमधील वाकोद येथे प्रसिद्ध आहेत. 

संगीताचे कोणतेही शिक्षण नसूनही फक्त गाणी ऐकून त्यांनी आपला गळा तयार केलाय. आपल्या या महाराष्ट्राच्या सिक्रेट सुपरस्टारला बोभाटाचा मनाचा मुजरा.

सबस्क्राईब करा

* indicates required