दादासाहेब फाळकेंच्या पुण्यतिथीनिमित्त चला बघूया राजा हरिश्चंद्राची मूळ क्लिप!

Subscribe to Bobhata

भारतीय चित्रपटाचे जनक 'दादासाहेब फाळके' यांची आज पुण्यतिथी.

 १०४ वर्षापूर्वी त्यांनी ’राजा हरिश्चंद्र’ बनवला आणि भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली. असं म्हणतात की त्यांनी "लाईफ ऑफ ख्रिस्त" हा मूकपट पाहिला आणि त्यांनी स्वदेशी चित्रपटांचं स्वप्न पाहिलं. त्याकाळी भारतात साधनं आणि सुविधांची मारामारच होती. तरीही अपार कष्टानंतर दादासाहेब फाळकेंनी पहिला भारतीय सिनेमा उभा केला.

(धुंडिराज उर्फ दादासाहेब गोविंद फाळके - स्त्रोत)

या सिनेमासाठीच्या पात्रांची जमवाजमव हा मोठाच प्रश्न होता. तारामतीची भूमिका करण्यासाठी कोणतीही स्त्री तयार होत नव्हती.  म्हणून दादासाहेबांनी 'अण्णा साळुंखे' यांना तारामातीची भूमिका दिली.  हे साळुंखे पुढे दादासाहेबांच्या 'लंका दहन' या चित्रपटातदेखील होते.  जवळ जवळ ५०० लोक 'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाच्या टीममध्ये होते. या साऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था एकट्या दादासाहेबांच्या पत्नी बघत होत्या. असा हा पहिलावहिला मराठी सिनेमा मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात पहिल्यांदा दाखवण्यात आला. गंमत म्हणजे हा सिनेमा मूकपट होता पण त्यात काम करणारे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक सगळे मराठी, तर मध्ये माहितीसाठी म्हणून दाखवलेल्या पाट्या हिंदी आणि इंग्रजीत होत्या. त्यामुळं पहिला हिंदी सिनेमा असण्याचा मानही तसा राजा हरिश्चंद्रलाच जातो. 

(दत्तात्रय दाबके आणि अण्णा साळुंखे राजा हरिश्चंद्र आणि ताराराणीच्या भूमिकेत :स्त्रोत)

१९१३ नंतर दादासाहेब १९३७ पर्यंत चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. मोहिनी भस्मासूर (१९१३), सावित्री सत्यवान (१९१४), श्रीकृष्णजन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९), सेतुबंधन (१९३२) ही त्यांच्या चित्रपटांची काही नावं. १९३७ पर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. 'गंगावतरण' (१९३७) हा त्यांचा शेवटचा सिनेमा.

अशा या चित्रपट महर्षींच्या आठवणींना उजाळा देत बोभाटा तुमच्यासाठी घेऊन आलं आहे चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' !

सबस्क्राईब करा

* indicates required