हे आहे युट्युब वर सर्वात जास्त वेळा पाहिलं गेलेलं गाणं !

Subscribe to Bobhata

"Despacito" हे गाणं तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी खूप जास्त आहे. आज या गाण्यानं एक महत्वाचा टप्पा पार केलाय. अवघ्या सात महिन्यात या गाण्यानं युट्युबवर सर्वात जास्त वेळा पाहिल्या गेल्याचा बहुमान मिळवलाय. Despacito हे गाणं आता तीन बिलियन वेळा (म्हणजे किती ते विचारू नका) पाहिलं गेलंय म्हणे.

Luis Fonsi आणि Daddy Yanki यांनी गायलेल्या या स्पॅनिश गाण्यानं अख्या जगाला वेड लावलंय. आपल्याला तर भाऊ या गाण्यात फक्त दोन शब्द कळतात despacito आणि पॅसितो पॅसितो. पण म्युझिक नक्की डोक्यात वाजत राहतं. या गाण्याच्या आधी विझ खलिफाच्या सी यु अगेन या गाण्यानं सर्वात जास्त वेळा पाहिल्या गेल्याचा बहुमान मिळवला होता. पण ते फक्त 3 आठवडे टॉपला राहू शकलं.

त्या आधी २०१२ ते २०१७ गंगम स्टाइलने हा मान मिळवला होता. आधी एक कोरियन-इंग्लिश गाणं आणि त्यांनतर एक स्पॅनिश गाणं टॉप स्पॉटवर असणे संगीताला भाषेचे बंधन नसल्याचेच आपल्याला सांगत असतं. तर मग मंडळी एखादं भारतीय गाणं बनेल का युट्युब वरच टॉप गाणं? तुम्ही उत्तर देई पर्यंत आपण या गाण्याचं देशी व्हर्जन ऐकूयात..

 

सबस्क्राईब करा

* indicates required