कारवाँ: ५००० आठवणींचा खजिना....त्यात तुमच्या किती आहेत ते बघा !!

युट्युब, सावन, गाना.कॉम, इत्यादी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली माध्यमे आपल्याला पाहिजे ती गाणी आपल्या समोर हजर करत असतात. सध्या जास्तीत जास्त माणसांकडे इंटरनेट आलेलं असल्याने युट्युब आणि नेट सर्फिंग वाढलेलं आहे. जेव्हा इंटरनेट नव्हतं आणि आजच्यासारखा प्रत्येकाच्या खिशात मोबाईल नव्हता तेव्हा गाणी ऐकण्याचा एकच मार्ग होता, आणि तो म्हणेज रेडीओ.

रेडीओ आता कालबाह्य झालाय पण तरी प्रत्येकाच्याच मनात तो कायमचा आहे. तसं तर आजही आपल्या मोबाईलमध्ये रेडीओ असतोच. हां,  तो कोणीही ऐकत नाही हे सोडा. अशा टेक्नोलॉजीच्या जमान्यात ‘सारेगामा’ या म्युझिक कंपनीने ‘कारवाँ’ नावाचा ‘पोर्टेबल डिजिटल ऑडियो प्लेयर’ बाजारात आणलाय. याला आपण ‘ऑडिओ प्लेयर’ कम रेडीओ म्हणू शकतो. कारण यात सुरुवातीलाच ५००० गाणी भरलेली असणार आहेत, शिवाय आपण यात रेडीओसुद्धा ऐकू शकतो.

सध्या या डिजिटल ऑडियो प्लेयरची एक सुंदर जाहिरात सगळ्यांचंच मन वेधून घेत आहे. यात एका पती-पत्नीचा आयुष्याचा प्रवास दाखवला आहे. जाहिरातीच्या सुरुवातीलाच ती पत्नी मुलाला झोपवताना ‘लग जा गले’ हे गाणं गात असते. पुढे त्यांचं वय वाढतं, पण हे गाणं दोघांसाठीही अजरामर असतं. आयुष्याच्या अखेरच्या टप्यात जेव्हा तिचा मृत्यू होतो, तेव्हा तो आपल्या पत्नीच्या जुन्या आठवणी जगवण्यासाठी या डिजिटल ऑडियो प्लेयरवर तेच गाणं लावतो. हाच जाहिरातीचा शेवट आहे.

मंडळी ही अॅड फिल्म तुम्ही खाली बघू शकता.

‘दि वोंब’ या एजन्सीने ही सुंदर संकल्पना मांडलीय आणि जाहिरातीचं दिग्दर्शन केलंय ‘क्रोम पिक्चर्स’च्या ‘अमित शर्मा’ या दिग्दर्शकाने. आजच्या डिजिटल युगात आपल्या आई वडिलांना भेट म्हणून देण्यासाठी एक बेस्ट गिफ्ट त्यांनी उत्तमरीत्या सादर केलं आहे. एकंदरीत ही अॅड फिल्म मस्त जमून आलीय. कदाचित बघताना तुमच्या डोळ्यात पाणीही येईल.

डिजिटल युगात ‘कारवाँ’ काय करतोय ?

आपल्याला जर गाणी ऐकायची असतील तर आपण डाउनलोड करून ऐकू शकतो, किंवा युट्युब तर आहेच. पण ५० पासून पुढील वयोगटातील लोकांना हे युट्युब, इंटरनेट, वायफाय इत्यादी तेवढसं माहित नसतं. आणि असलं तरी त्यांना हे सगळं तितकं सोपं वाटत नाही.  त्यांच्याकडे भारीतला मोबाईल असतो, पण  त्यातील बरेचसे फिचर माहितही नसतात. अशा लोकांसाठी अगदी साजेसं असलेलं माध्यम म्हणजे रेडीओ. याच जुन्या सुरेल आठवणी जगवण्यासाठी सारेगामा घेऊन आलं आहे ‘कारवाँ’.
आपण ‘कारवाँ’ खालील लिंकवरून घर बसल्या मागवू शकता!!

सबस्क्राईब करा

* indicates required