४३० कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला कुत्रा!! ही संपत्ती त्याला वारसाहक्काने मिळालीय. आता बोला!!

काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा इंटरटेनमेंट नावाचा सिनेमा आला होता. यात प्रचंड श्रीमंत व्यक्ती आपली संपत्ती कुत्राच्या नावे सोडून जातो असं कथानक होतं. मग ती संपत्ती मिळवण्यासाठी होणारी चढाओढ यात दाखवली आहे. या सिनेमाची स्टोरी विचित्र वाटली असेल तर सेम टू सेम घटना घडली आहे.

गंथर 6 नावाचा जर्मन शेफर्ड एक कुत्रा चक्क ४३० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. विशेष गोष्ट म्हणजे ही स संपत्ती त्याला वंशपरंपरागत पध्दतीने मिळाली आहे. त्यातही २३० कोटी किंमत असलेली एक हवेली त्याने विकायला काढली आहे. ही मियामी हवेली कधीकाळी प्रसिद्ध गायिका मॅडोनाच्या नावावर होती.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे ही हवेली आहे. या हवेलीत ९ बेडरूम्स आहेत. ही संपत्ती या कुत्र्याकडे कशी आली याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर काही लोकांचा आपल्या कुत्र्यांवर मुलांसारखा जीव असतो. १९९२ साली काऊंटेस कार्लोटा लिबेंस्टीन नावाच्या महिलेने आपल्या मृत्यूआधी ही संपत्ती गंथर 3 या कुत्रांच्या नावे केली होती.

पुढे त्या महिलेचा आणि गंथर 3 चा पण मृत्यू झाला. आता या संपत्तीचा हक्क गंथर 6 कडे आला आहे. ही हवेली एखाद्या राजमहालाला लाजवेल अशी आहे. स्विमिंग पूल गार्डन अशा सर्व सोयीसुविधा या हवेलीत आहेत. या गंथरचा थाट बघत राहावा असा आहे.

भावाच्या दिमतीला अनेक नोकर आहेत. त्याच्या सेवेसाठी स्पेशल टीम आहे. रुबाब म्हणजे रुबाब आहे त्याचा. आता एका कुत्र्याकडे एवढी संपत्ती म्हटल्यावर ती हडप करण्याचे पण प्रयत्न होतात. एक व्यक्ती या संपत्तीचा मालक आपण स्वतः असल्याचे सांगून संपत्तीवर दावा करत आहे. पुढे जाऊन ही संपत्ती गंथर 6 कडेच राहते की त्याच्याकडून ती हिसकावली जाते हे कळेलच.

बाकी, प्राण्यांना अशी संपत्ती मिळणं काही नवीन नाही. ही मांजर चक्क २१,०००,०००,००० रुपयांची मालकीण आहे??? नक्की प्रकरण काय आहे??

 हे ही तुम्ही वाचलं असेलच!!

सबस्क्राईब करा

* indicates required