सुपर आजी : या आजी तरुणांपेक्षा जास्त चांगला डान्स करून राहिले ना भाऊ !!

सध्या जर कोणात एनर्जी ठासून भरली आहे, तर ती आहे वृद्धांमध्ये. ही मंडळी फक्त वयाने मोठी आहेत. पण एनर्जीने तरुणांनासुद्धा मागे टाकतील. यांच्याकडे बघून तर भले भले चाट पडतील. आता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, एका आजींचा एनर्जीने भरलेला डान्स व्हिडीओ.

मंडळी ६ डिसेंबर रोजी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर आला आणि या आजींचा डान्स सगळ्यांनाच प्रचंड आवडला. व्हायरल होणार यात काही नवल नव्हतं, कारण डान्स तेवढाच तगडा आहे राव. ५० लाखपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघून त्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा केलंय आणि सोशल मिडियाला कधी नाही ते सर्वात तरुण सेलिब्रिटी मिळाली आहे !!

सध्या वेस्टर्न गाण्यांची आणि डान्सची चलती असताना या आजींनी मात्र लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘जा तोसे नहीं बोलूं कन्हैय्या’ हे १९५६ सालचं गाणं निवडलं आहे. गाण्यांच्या बोलांबरोबर त्यांचा डान्स म्हणजे लाजवाब आहे.

मंडळी हा व्हिडीओ #Respect या हॅशटगने लोक शेअर करत आहेत. या आजीचं वय बघता त्यांच्या डान्सची खरंच दाद दिली पाहिजे!!

सबस्क्राईब करा

* indicates required