computer

फिल्मफेअर पुरस्कार : कोणा कोणाला मिळाली फिल्मफेअरची बाहुली ? लिस्ट बघून घ्या राव !!

ऑस्कर जितका भारतात ज्याला मानाचा दर्जा आहे तो '६३ वा फिल्मफेअर अवॉर्ड्स' सोहळा नुकताच पार पडला. गेल्यावर्षी रिलीज झालेले हिंदी मिडीयम, सिक्रेट सुपरस्टार, बरेली की बर्फी, बद्रीनाथ कि दुल्हनिया आणि टॉयलेट-एक प्रेम कथा या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचे नॉमिनेशन मिळाले होते. त्याचबरोबर आयुष्मान खुराणा, शाहरुख खान, इरफान खान, ह्रितिक रोशन, वरूण धवन, या अभिनेत्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचं नामांकन मिळालं होतं. अभिनेत्रींच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्या बालन, आलीया भट, झाहिरा वसीम, श्रीदेवी, सबा कमर अशी तगडी कॉम्पिटीशन होती.

तर या सगळ्या नॉमिनेशनमधून ज्यांनी बाजी मारली त्याचा निकाल शनिवारी वरळीत झालेल्या सोहळ्यात लागला आहे.

चला तर बघूयात कोण ठरलंय या वर्षीचं उत्कृष्ट...फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात मिळाल्या पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे :

सर्वोत्कृष्ट चित्रपट : हिंदी मीडियम

सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटीक्स अवॉर्ड : न्यूटन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विद्या बालन (तुम्हारी सुलू)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : इरफान खान (हिंदी मीडियम)

सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटीक्स अवॉर्ड : राजकुमार राव (ट्रॅप्ड)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटीक्स अवॉर्ड : झायरा वसिम (सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकोणा सेन शर्मा (अ डेथ इन द गुंज)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर वीज (सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश केवल्य (शुभमंगल सावधान)

सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशीष भुतियानी (मुक्ती भवन)

सर्वोत्कृष्ट मूळकथा : अमित मसुरकर (न्यूटन)

सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट (शोर्ट फिल्म) : ज्यूस

सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुचित्रपट) : जॅकी श्रॉफ (खुजली)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : जग्गा जासूस

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंग (रोके ना रुके नैना- बद्रीनाथ की दुल्हनिया)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचडी फिरा - सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - जग्गा जासूस)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : विजय गांगुली आणि रुएल दौसन वरिंदानी (गलती से मिस्टेक- जग्गा जासूस)

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन : शिरीष गुंज (अ डेथ इन दि गुंज)

जीवनगौरव पुरस्कार : माला सिन्हा आणि बप्पी लाहिरी

सबस्क्राईब करा

* indicates required