मराठीतील पहिला डॉक्युफिक्शन सिनेमा-'उदाहरणार्थ नेमाडे'

 
'उदाहरणार्थ नेमाडे' - ट्रेलर | 'Udaharnarth Nemade' - Trailer

मायबाप रसिकहो .... आज 'उदाहरणार्थ नेमाडे' चं ट्रेलर सादर करत आहोत..

Posted by उदाहरणार्थ नेमाडे -Udaharanarth Nemade on Monday, May 9, 2016

Facebook / उदाहरणार्थ नेमाडे - via Iframely

 

भालचंद्र नेमाडेंचं साहित्य वाचलं नाही असा मराठी रसिक मिळणं अवघड आहे. त्यांचा पांडुरंग सांगवीकर म्हणजे उदाहरणार्थ थोरच.  वेगळी लेखनशैली आणि आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन यांमुळे त्यांची कोसला, जरीला, हूल, बिढार ही सगळी पुस्तकं खूपच लोकप्रिय आहेत. हां, आता हिंदूबद्दल संमिश्र मतं आहेत खरी.

 

दिग्दर्शक अक्षय इंडीकर नेमाडेंच्या जीवन व साहित्यावर आधारित  मराठीतलापहिलावहिला डॉक्युफिक्शन सिनेमा घेऊन येताहे्त-"उदाहरणार्थ नेमाडे". डॉक्युफिक्शन म्हणजे काय म्हणून विचाराल तर डॉक्युमेंट्री म्हणजेच माहितीपट आणि कल्पना यांना एकत्र साधून केलेलं सिनेचित्रण. 

आज "उदाहरणार्थ नेमाडे"चा पहिला ट्रेलर रिलीज झालाय. पाहूया आपला सांगवीकर आपल्याला कधी आणि कसा भेटायला येतो ते..

सबस्क्राईब करा

* indicates required