computer

व्हिडिओ: पहिल्या पगाराचा आनंद पाहाच. तुम्ही तेव्हा काय केलं होतं?

पैसे हातात पडल्याचा आनंद हा वेगळाच असतो. पैसे हातात पडण्याआधीच या पैशांचे काय करायचे याचा हिशोब झालेला असतो. अनेक जणांच्या खुशीचा थांग पैसे हातात पडल्यावर लागत नाही. दिल्ली येथील एका मुलीचा पैसे हातात पडल्यावरचा आनंद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

एटीएममधून पैसे काढत असताना एक मुलगी एटीएममधील सीसीटीव्हीत दिसत आहे. पैसे काढताना ही पोरगी अफलातून डान्स करते. एटीएममधून पैसे काढत असताना पार कराव्या लागणाऱ्या प्रत्येक स्टेपगणिक हिच्या डान्सच्या स्टेप्सही बदलतात.

एटीएममधून पैसे बाहेर निघत असताना झलक दिखला जा गाण्यातल्या आजा आजा स्टेप ती करते. शेवटी पैसे हातात पडल्यावर शेवटचा डान्स पूर्ण करून ती एटीएमला दोन्ही हात जोडून निघून जाते. एका इन्स्टाग्राम पेजवर पगार झाल्याचा आनंद या कॅप्शनने हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

इंस्टाग्रामवर अवघ्या २४ तासांत हा व्हिडीओ २८ लाख लोकांनी पाहिला आहे तर ३ लाख लाईक्स या व्हिडिओला आले आहेत. मेहनतीचे पैसे हातात पडल्यावर अशा प्रकारे आनंद साजरा करणे योग्यच असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एकूण पोरीने मात्र लोकांचा 'दिल' जिंकला हे मात्र तितकेच खरे आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required