Mary Had a little lamb ही कविता खरोखरी घडतेय, व्हिडिओ पाह्यला का?
तुम्ही शाळा मराठीतून शिकला असाल किंवा इंग्रजी माध्यमातून, "मेरी हॅड अ लिटल लँब" ही कविता सगळ्यांना माहित असतेच!! ही कविता प्रत्यक्षात अनुभवायला सध्या मिळतेय. एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. एक मुलगी शाळेचा युनिफॉर्म घालून आपल्या शाळेच्या दिशेने निघाली आहे. तिच्या मागोमाग एक बकरी पण जात आहे. आपल्या सोबतीला शाळेत सोडायला जातानाचा या बकरीचा हा व्हिडीओ आहे.
Two friends going to school in #HimachalPradesh ❤ pic.twitter.com/BzbhdouvHk
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) September 20, 2021
हा व्हिडीओ बघितल्यावर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या बकरीला त्या मुलीशिवाय करमत नसेल. याचसाठी तिचा शाळेत जाण्याच्या वेळेत तरी सोबत राहावे म्हणून ती त्या मुलीच्या मागे मागे जात आहे. दिवसभर आपल्या मैत्रिणीची वाट बघत ती घरी थांबत असेल.
त्या मुलीने या बकरीला मोठा लळा लावल्याचे व्हिडीओवरून दिसते. नेटकऱ्यांनी या सुंदर व्हिडिओचे भरभरून कौतुक केले आहे. माणसांची आणि प्राण्यांची मैत्री किती सुंदर असते याचे अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. अनेक सिनेमे या विषयाला धरून तयार करण्यात आले आहेत. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच हे प्राणी झालेले असतात. दैनंदिन जीवनात त्यांचा सहभाग हा नेहमीचा झालेला असतो. प्राण्यांचे असे प्रेम ज्यांना मिळते ते खरोखर नशीबवान असतात असेही मत काहींनी व्यक्त केले आहे!!
--उदय पाटील




