हा गोरिल्ला करतोय घुमर डान्स...दीपिका पेक्षा याचीच चर्चा जास्त आहे राव !!

पद्मावती सिनेमाचा वाद सध्या शिगेला पोहोचलाय. पद्मावतीच्या चित्रकारणापासून हा वाद सुरु आहे. मंडळी हा वाद कितीही मोठा असला तरी पद्मावती मधलं एक गाणं सध्या प्रचंड गाजतंय. या गाण्यात दीपिका ‘घुमर’ नृत्य करताना दिसत आहे आणि गाण्याचं नावच ‘घुमर’ आहे. पद्मावती सिनेमाती हे पाहिलं गाणं रिलीज करण्यात आलं होतं.

घुमर मधला दीपकाचा लुक, तिचे कपडे, तिचा डान्स, सेट, संपूर्ण गाणं असं सगळंच प्रसिद्ध झालं. मंडळी या गाण्यात दीपिकाने कितीही चांगला डान्स केला असला तरी तिला ‘टफ’ द्यायला ‘तो’ आलाय. त्याने तिच्यापेक्षा भारी डान्स करून सोशल मिडिया गाजवलाय राव.

हा कोण आहे ? मंडळी हा आहे एक "गोरिल्ला".... दीपिकाने महालात घुमर डान्स केला असला तरी या पठ्याने चक्क ‘टब’ मध्ये डान्स केलाय. मानलं बाबा याला !!

WYO च्या फेसबुक पेज वरून हा व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओ वरूनच दिसतंय की हा सगळा 'गोरिल्ला डान्स' कम 'घुमर डान्स' हा मुद्दाम बनवला गेला आहे. खरं तर हा गोरिल्ला कॅनडाच्या 'झु' मध्ये राहत आहे. तो नाचत असलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला आणि त्यावर 'घुमर' गाणं फिट बसलंय. एकंदरीत व्हिडीओ जमून आलाय राव !!

तर, आता तुम्हीच बघा आणि ठरवा कोणाचा डान्स चांगला आहे !!

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required