माणसा पासून माकडा पर्यंतचा प्रवास: भेटा भारताच्या मंकी मॅनला !!

Subscribe to Bobhata

असं म्हणतात की आजचा माणूस हा माकडा पासून तयार झाला पण भारतात असा एक माणूस आहे ज्याचा प्रवास माणसा पासून माकडा पर्यंत झाला आहे. मंडळी, हा आहे कर्नाटकचा ‘ज्योती राज’ उर्फ ‘मंकी मॅन’. हा पठ्ठ्या कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय भिंतीवर एका झटक्यात चढतो जे फक्त माकडालाच जमू शकतं.

मंडळी, ज्योती राज हा एकेकाळी नैराश्याने भरला होता. या नैराश्येतून तो आत्महत्या करायला निघाला.  त्याने चित्रदुर्ग किल्ल्या जवळच्या एका उंच दगडावरून उडी मारायचं ठरवलं पण या दगडावर चढायचं कसं हे त्याला माहित नव्हतं. त्याचवेळी एक माकड तिथे आलं आणि काही क्षणात माकडाने तो उंच दगड पार केला. ज्योती राज ने या माकडाचं अनुकरण केलं आणि तोही बघता बघता तो अवाढव्य दगड चढून टोकावर पोहोचला. पण त्याने जेव्हा खाली बघितलं तेव्हा तो चकित झाला कारण अनेकजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. या टाळ्या होत्या त्याच्या कामगिरी बद्दल जी नकळत त्याच्या हातून घडली होती. यानंतर मात्र ज्योतीने जीव देण्यापेक्षा लोकांचं मनोरंजन करण्याचं काम हाती घेतलं.

स्रोत

लोकांनी असा माणूस कधीच बघितला नव्हता जो एका उभ्या दगडावर आरामात चढून जातो. ज्योती म्हणतो त्या प्रमाणे त्याने ही कला माकडांकडूनच शिकला आहे. त्या दिवसा नंतर ज्योती राज चित्रदुर्ग किल्ल्याजवळ नेहमी येऊ लागला आणि माकडांकडून स्टंट शिकू लागला.

अनेक वर्ष सराव केल्यानंतर तो आता एक्स्पर्ट झाला आहे. चित्रदुर्ग किल्ल्याजवळ आपल्या करामती दाखवून तो पर्यटकांचं मनोरंजन करतो. याशिवाय त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याने भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच धबधब्यावर चढाई करून रेकॉर्ड बनवला आहे.

स्रोत

माणसापासून माकडा पर्यंतचा हा प्रवास तितका सोप्पा नव्हता मंडळी. यात त्याचे २० हाडं तुटली आणि अनेकदा सर्जरी झाल्या आहेत. सध्या त्याच्या शरीरात ४ रॉड आहेत राव.
ज्योती राज सध्या स्थानिक मुलांना पर्वतारोहण शिकावण्याचं काम करतो. आता त्याचं लक्ष आहे जगातील सर्वाज उंच इमारत म्हणजे बुर्ज खलिफावर चढाई करणं. मंडळी यावरूनच दिसतं की त्याचा त्याच्या हातांवर किती विश्वास आहे.

आपल्या देशाच्या या मंकी मॅन ला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required