घरात घुसणारं पावसाचं पाणी रोखण्यासाठी लारा दत्ताचा नटखट टॉवेल जुगाड...

मुसळधार पावसाने सद्या मुंबईनगरी न्हाऊन निघालीय. जिथं तिथं पाणी पाणी झाल्यानं सगळ्याच मुंबईकरांचे हाल होतायत मंडळी. अशात बॉलीवूड अॅक्ट्रेस लारा दत्ताने घरात शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याला रोखण्यासाठी अशी काही शक्कल लढवलीय की ती पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल...

स्त्रोत

मंडळी, खिडक्या आणि दरवाजांच्या फटीतून घरात येणारं पाणी रोखण्यासाठी या मिस युनिव्हर्स लाराबाईंनी चक्क त्यांच्या पतीदेवांचे, म्हणजेच टेनिसपटू महेश भुपतीचे टॉवेल वापरलेत! हे सगळे टॉवेल तिने आपल्या दरवाजांच्या फटीत कोंबले आहेत. आणि वर गंमत म्हणून याचा फोटो टिपून तो ट्विटरवरही टाकलाय. मुख्य म्हणजे हे टॉवेल काही किरकोळ नाहीत, तर ते महेश भुपतीने विंबल्डन युएस ओपन, अॉस्ट्रेलिया आणि फ्रेंच ओपन अशा मोठ्या टेनिस स्पर्धांमध्ये वापरलेले आहेत. हे टॉवेल्स त्याने आठवण म्हणून जपून ठेवलेले होते!! त्याच्या बायकोने त्यांचा आता 'असा' सदुपयोग केलाय...

बायकोचा हा कारनामा जेंव्हा महेश भूपतीरावांना समजला, तेंव्हा त्यानीही ट्विटरवर रागीट मुद्रा धारण करून आपली अनेक वर्षांची मेहनत ही अशी पाण्यात जात असल्याचा शोक व्यक्त केला...

बोध वैगेरे काही नाही, पण तुम्ही कोणीही असलात तरी तुमच्या घरीही तुमची अशीच खेचली जाऊ शकते एवढंच... दरम्यान इतके महत्वाचे टॉवेल्स ही लारा अशा कामासाठी कशी काय वापरू शकते असं म्हणत इतर लोकांनीही भूपतीचीच साथ दिलीय..

सबस्क्राईब करा

* indicates required