मधु सप्रे : तो अजगर आजही तिची आठवण काढून व्याकुळ होत असेल !!

आज १४ जुलै,मधु सप्रे या सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीचा  वाढदिवस! १९९२ साली फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावणार्‍या मधुने त्याच साली झालेल्या 'मिस युनिव्हर्स'मध्ये तिसरा क्रमांक पटकावून सगळ्यांचे लक्ष वेधले. १९९५ साली मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांनी एक नग्न जाहिरात आली होती ज्यामुळे खूप वादंग निर्माण झाले आणि याप्रकरणी त्यांना कोर्टामध्ये पण खेचण्यात आले. १९७१  साली जन्म झालेल्या मधु सप्रे यांनी त्या वेळी मॉडेलिंग क्षेत्रात खूप सारी धमाल उडवून दिली होती. मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं नंतर सर्वांचे स्वप्न एकच असते ते म्हणजे बॉलिवुड. पण मधु ला बॉलिवुड मध्ये फार यश मिळाले नाही.२००३ साली आलेल्या कैजाद गुस्ताड दिग्दर्शित 'बूम' चित्रपटामध्ये अनु गायकवाडची भूमिका तिने साकारली होती. ब्लॅक कॉमेडी थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन. जॅकी श्रॉफची. गुलशन ग्रोवर. कतरीना कैफ सारखी तगडी स्टारकास्ट असून सुद्धा या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्या नंतर मधु सप्रे हे नाव प्रकाशझोतातून दूरच गेले.सध्या मधु सप्रे या रिकोन या इटलीतल्या शहरात राहतात. सुप्रसिद्ध इटालियन बिझनेस मान जिआँ मारिओ एमेंडतोरी यांच्याशी २००१साली त्या लग्न करून तिथेचस्थायिक झाल्या. अशा मराठमोळ्या मॉडेल आणि अभिनेत्रीला आज वाढदिसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा !!

-मंगेश गुरव

सबस्क्राईब करा

* indicates required