जॉर्जियाज गॉट टॅलेन्ट : मराठमोळ्या तरूणांचा सातासमुद्रापार डंका

तुम्हाला तर माहितीच आहे भाऊ, आपले इंडियन लोक जगात जीथे पण जातात, चांगलीच हवा करतात. आता हे व्हीडीओज बघा ना, भारतात जसा 'इंडियाज गॉट टॅलेन्ट' नावाचा असामान्य टॅलेन्टवाल्यांचा शो असतो, तसाच तो अन्य काही देशातही आयोजीत केला जातो. 

तर हे व्हीडीओज आहेत 'जॉर्जियाज गॉट टॅलेन्ट' या शोचे. ज्यात २०१६ मध्ये तीन मराठी तरूणांनी मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती करून चक्क फायनल पर्यंत मजल मारली होती. अनुप ठाकूर, तानाजी मांडवकर आणि सुरज तुरटे अशी या तिघांची नाव आहेत. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की या तिघांचं मल्लखांबावरील कौशल्य बघून तिथल्या प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रीया आहेत. पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये यांनी गोल्डन बझ मिळवलाय राव! व्हीडीओ बघुन तुमच्याही अंगात अभिमान संचारेल, बघा तर...

अंतिम फेरीतील परफॉर्मन्स...

सबस्क्राईब करा

* indicates required