computer

माकडचेष्टा करणाऱ्या आईस्क्रीमवाल्यावर ग्राहक सवाई ठरतो तेव्हा !! हा व्हिडिओ पाहाच..

आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही? भले मग तो कुठलाही ऋतू असो!! उन्हाळ्यात गरम होते म्हणून, थंडीत आईस्क्रीम खाल्याने पोटात उष्णता वाढते म्हणून, तर पावसाळ्यात आईस्क्रीम खाल्याने पचनशक्ती वाढते. अशी कितीतरी कारणं आईस्क्रीम खायला आणि सेलिब्रेशन करायला पुरेशी आहेत. असाच एक आईस्क्रीम खायला निघालेला माणूस चक्क विकेत्याला चकवून मोठा स्कूप घेऊन पळून जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की तो पाहून नेटकरी हसून हसून डोक्याला हात लावतायेत. तुम्हीही एकदा पाहून घ्याच.

तुम्ही बऱ्याचदा आइस्क्रीम प्रँक करताना पाहिले असेल. म्हणजे विक्रेता आपल्या हातात रिकामा कोन देतो आणि स्कूप देताना हातचलाखी करत आईस्क्रीम उडवतो किंवा लपवतो आणि सगळ्यात शेवटी अचानक ते स्कूप न पाडता अगदी सहज कोनमध्ये देतो. ही गंमत पाहायला मजा येते. पण तुम्हाला माहितेय का हा प्रँक ही टर्कीमधील एक परंपरा आहे. तिथे आईस्क्रीम विक्रेते ग्राहकांना खेचून आणण्यासाठी ही गंमत करतात. आइस्क्रीम प्रँकची सुरुवात टर्कीमधील कहरामनमाराश शहरात झाली होती. पण आता तो इस्तंबूलमध्ये लोकप्रिय आहे. विक्रेते आईस्क्रीम कोन देतात आणि नंतर ग्राहकाला ते देण्याआधी ते फिरवून, हवेत फेकून आणि गायब करून ते ग्राहकांना देतात असे वाटते आणि तितक्यात ते काढून देखील घेतात. विक्रेते स्मार्ट असतात. पण या व्हिडिओत ग्राहक विक्रेत्यावर चक्क सवाई ठरला आहे. आईस्क्रीम विक्रेत्याचा प्रँक त्याच्यावरच भारी पडलाय.

व्हिडीओत त्या तरुणाने कोन हातात घेतला आणि जेव्हा तो विक्रेता स्कूप देण्यासाठी प्रँक सुरू करणार असतो, हा पठ्ठ्या चक्क तो अख्खा आईस्क्रीमचा गोळा घेऊनच पळून जातो. विक्रेता त्याच्याकडे अवाक होऊन पाहत राहतो आणि पाहणारे सगळे हसतात. त्याच्या मित्रांनी हा व्हिडिओ शूट केला आणि काही तासांत तो व्हायरल झाला. या प्रँकची एक मजेशीर बाजू पाहायला मिळाली त्यामुळे त्याला लाईक्स ही भरपूर मिळाले.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required