आता फेसबुक वर दिसतेय एका मराठी शब्दाची जादू!!

२६ जून रोजी हॅरी पॉटरला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फेसबुकने एक धमाल जादू आणली होती. ते एक असं फिचर होतं ज्यामुळे आपण 'Harry Potter', 'Gryffindor', 'Ravenclaw', 'Hufflepuff', किंवा 'Slytherin' यापैकी काहीही फेसबुकवर लिहू आणि त्यावर जेव्हा क्लिक करू तेव्हा एक जादूची छडी प्रकट होऊन संपूर्ण स्क्रीनवर जादू पसरवायची. 

इंग्रजीनंतर आता एका मराठी शब्दाचाही या भारी फीचरमध्ये समावेश झालाय. तो शब्द आहे अभिनंदन. फेसबुकवर तुम्ही कुठेही अभिनंदन हा शब्द लिहून पोस्ट केलात किंवा एखाद्या पोस्टवर हा शब्द कॉमेन्ट केलात तर तो लाल रंगाचा आणि ठळक दिसू लागेल. सोबतच त्यावर तुम्ही क्लीक केल्यास तुमच्या स्क्रीनवर वरच्या दिशेने आवाज करत जाणारे कलरफुल फुगे दिसतील!! यासाठी तुम्ही खाली दिलेला व्हीडीओ पाहू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुमचं फेसबुक अॅप अप टू डेट असणं गरजेचं आहे. एखाद्याचं अभिनंदन करण्यासाठी या फिचरचा आपल्याला छान उपयोग होऊ शकतो. 

 

यासोबतच तुम्ही Xoxo हा शब्द फेसबुकवर लिहीलात तर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर बदाम उमटलेले दिसतील. मग आता वाट कसली बघताय? जा फेसबुकवर आणि करा ट्राय!

सबस्क्राईब करा

* indicates required