खास संक्रातीचं ठसकेबाज गाणं- बाई मी पतंग उडवत होते..

Subscribe to Bobhata

संक्रांतीच्या काळातली संध्याकाळ आहे. हवेत अंगावर हलकासा काटा येईल असा आणि इतकाच  थंडावा आहे. वारा फोफावला आहे. हा मौसम आहे पतंग उडवण्याचा , काटाकाटी करण्याचा , पतंग कापला गेला तर हळहळण्याचा!! 
आणि पतंग उडवणं म्हणजे पोसोरांचाच खेळ आहे असं नाही, तर थोरामोठ्यांचापण आहे. पतंग उडवणं पोरांसाठी खेळ तर थोरांसाठी बाजीचा -पैजेचा -इर्षेचा - मामला आहे.

कमलाकर  तोरणेंच्या "लाखात अशी देखणी " या सिनेमातलं "बाई मी पतंग उडवीत होते" हे गाणं तुम्ही या आधी ऐकलं असेलच. या गाण्यात इर्षेच्या अनेक छ्टा आहेत. आशाबाईंनी गायलेल्या या गाण्याच्या मुखड्यातच त्यांनी पतंगचा उच्चारच प्पतंग असा काही  ऐटबाज आणि कुर्रेबाज केला आहे की गाण्याचं प्रत्येक कडवं ऐकणार्‍याला हळूहळू आभाळात घेऊन जातं .
आशाबाईंचा ठसकेदार आवाज, ग.दि. माडगूळकरांची शब्द रचना आणि सुधीर फडक्यांचे संगीत असलेले हे गीत आता नाही तर कधी ऐकणार ?



चढाओढीने चढवीत होते, गं बाई मी पतंग उडवीत होते॥

होता झकास सुटला वारा,
वर पतंग अकरा-बारा,
एकमेकांना अडवित होते, अडवित होते, गं अडवित होते.. 
बाई मी पतंग उडवीत होते॥

काटाकाटीस आला ग रंग,
हसू फेसाळ घुसळीत अंग,
दैव हारजीत घडवीत होते, घडवीत होते गं घडवीत होते..
बाई मी पतंग उडवीत होते॥

माझ्या दोर्‍यानं तुटला दोरा,
एक पतंग येई माघारा, 
गेला गुंतत गिरवीत गोते, गिरवीत गोते गं गिरवीत गोते..
बाई मी पतंग उडवीत होते॥

सबस्क्राईब करा

* indicates required