अमेझॉनचा गलथान कारभार - मराठी सिनेमासाठी 'तेलगु' सिनेमाचं पोस्टर !!!

भाऊ इंटरनेटवर बऱ्याच गडबडी होतात पण अमेझॉन या एका प्रतिष्टीत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने जे केलंय ते या पलीकडचं आहे. तुम्ही जर ‘७२ मैल एक प्रवास’ सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला अर्थात माहित असेलच की हा सिनेमा मराठी आहे आणि त्यात स्मिता तांबे या अभिनेत्रीने काम केलंय. पण राव जर तुम्ही या सिनेमाची डीव्हीडी अमेझॉनवर घ्यायला गेलात तर तुमची गोची होऊ शकते.

अमेझॉनवाल्या लोकांनी ७२ मैल एक प्रवास चित्रपटाच्या डीव्हीडीसाठी चक्क ‘मक्खी’ या सिनेमाचं पोस्टर लावलंय. आता मक्खी कुठे आणि आपला मराठमोळा ‘७२ मैल’ सिनेमा कुठे राव. हे लोक एवढ्यावरच थांबलेले नसून आणखी एका चित्रपटाची यांनी अशीच वाट लावली आहे.

‘कथा दोन गणपतरावांची’ या दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशे अभिनित चित्रपटाला ‘अमेरिकन गँगस्टर’ या चित्रपटाच्या चक्क तेलगु डब व्हर्जनचा फोटो चिकटवलाय. हि मात्र हद्दच झाली राव. या अमेझॉनवाल्यांना आपलं मराठी कल्चर कळतं की नाय ? कळत नसेल तर कधी पुण्यात ये म्हणावं. तेही जमत नसेल तर गुगल करा ना राव ! एवढं सिम्पल असतंय तरी हे लोक लहान मुलांसारख्या चुका करतात. असो.

मंडळी हा असा गलथान कारभार अमेझॉनच्या बेजबाबदारपणाचं लक्षण आहे आणि हे याआधी बऱ्याचवेळा घडून सुद्धा अमेझॉन सुधरायला तयार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required