computer

विमानतळावर घुसले माकड!! तिथे काय करामती केल्या हे पाह्यलं का?

भारतात पर्यटनस्थळी किंवा धार्मिक ठिकाणांवर माकड दिसणं काही नवलाचं नाही. येणारे जाणारे लोक त्यांना फळे आणि इतर खाद्यपदार्थ देतात. त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकतात. इतरही ठिकाणी माकड अधूनमधून दिसून येत असतात. पण दिल्लीत अशा ठिकाणी माकड दिसून आला ज्याची कोणी कल्पना केली नसेल.

 

दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी लाऊंजमध्ये एक माकड आलं होतं. हे माकड इथवर हा कसं पोहोचलं हे तर कोडंच आहे. पण त्या माकडने तिथे आणखी काय उपद्व्याप केले हे आणखी मजेशीर आहे. हे माकड तिथे येऊन नुसतं बसलं किंव उड्या मारत नव्हतं, तर त्याने आरामात ज्यूस प्यायला. वरून बार काउंटरवर मस्तपैकी जेवण ही केले. साहजिक या माकडाचा हा व्हिडीओ शूट करण्याची संधी लोकांनी सोडली नाही.

हा माकड एवढी तगडी सुरक्षा मोडून तिथवर कसा पोहोचला याबद्दल सर्वांना प्रश्न पडला आहे. सुरक्षा रक्षकांनी वेळीच तिथे पोहोचून त्याला आरामात बाहेर काढले. वनविभागाला पण या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेमुळे मात्र कुठल्याही प्रवाशाला काही त्रास झालेला नाही तसेच विमान वाहतुकीवर पण या घटनेचा काही फरक पडला नाही. लोकांना मात्र या घटनेमुळे आपली डोक्यालिटी दाखवण्याची आयती संधी मिळाली आहे. सोशल मीडियावर अफलातून प्रतिक्रियांना उत आला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required