या आठवड्यात रिलीज होणारे २ भन्नाट सिनेमे !!!

बोले तो मेरेको तो लागताय ना भिडू बाहुबली के बाद कोई पिच्चर बचीही नही जो मै थेटर मे जाके देखेगा. पर कसं हाय मंडली आपली फिल्लम इंडस्ट्रीत लय किडे हायत. एक पिच्चर जातो तोच दुसरा लायनीत हायच उभा. पन एक हाय हां, बाहुबली रिलीज होनार म्हणून बाकी शिन्मे सुमडीत बाजूला झाले. च्यायला आधीच अंदाज घेतात हे लोक (पक्का याचं साटलोटं हाय).

आता २ हप्ते गेल्या नंतर १२ मे ला २ लय भारी पिच्चर येतायत. कोनते ? सांगतो की गड्या!!!

१. मेरी प्यारी बिंदू !

नावा वरनं तुम्हाला कल्ल्लाच असलं की ही तर लव स्टोरी हाय. आता यात नवीन काय तर अख्ख्या फिल्लममधी बॉलीवूडच्या जुन्या गान्याची झलक दिसते अन त्याच्या सायडने स्टोरी पुढं पुढं जाते. राव यांचा ट्रेलर तर जाम आवडला आपल्याला. ३ फिल्लमचे ट्रेलर बसतील एवढ्या वेळात या एकट्या शिन्माचा ट्रेलर हाय. पुरे ७ मिनिटं ११ सेकंद.

ट्रेलरमध्ये ५ चाप्टर दिलेत अन ६ वा चाप्टर थेट थेटरात बघायचा. काय कल्ला ना ? थेटरात !!!

२. सरकार ३ !

रामू म्हनजे भारीच मानुस. काय ते एकशे एक शिन्मे. त्याचा हुकुमचा एक्का म्हंजी सरकार. (आता गॉडफादर वरुन उचल्लाय ते वेगली गोष्ट) अमिताभ ‘आज्जा’ परत येनार भौ. त्याच्या गोविंदा गोविंदावर तर जम फिदा ना आपन. जॅकी श्रॉफ भाऊ, वासेपूरवाले मनोज वाजपेयी काका, रोहिणी हट्टंगडी आजी असले भारीतले कलाकार असल्यावर केमिष्ट्री जोमेट्री एक नंबर असणार ना.

आता हे दोन लय भारी फिल्लम येनार पन तुम्ही बघणार कोनता? भाई आपल्याला विचारनार तर मी तर म्हनेन मेरी प्यारी बिंदू बघायला पायजे. काय हाय ना, सरकार मध्ये काय असणार हे आपल्याला आधीच माहितीय. पण बिंदू मध्ये (म्हणजे सिनेमात) नक्की काय हाय ते आपल्याला माहित नाय ना !.

आता तुमीच ठरवा मंडली कोणता शिन्मा बघायचा! राम राम !!!

सबस्क्राईब करा

* indicates required