'सेक्रेड गेम्स २' चे ४ पोस्टर आलेत भाऊ...नव्या सिझन मध्ये काय असेल याचा अंदाज लागतोय का बघा !!

गेल्याच आठवड्यात नेटफ्लिक्सने एक गूढ पोस्टर रिलीज केलं होतं. “कॅलेंडर निकाल, तारीख लिख ले. १४ दिन में कुछ बड़ा होने वाला है”. हा एवढा मजकूर आणि त्यासोबत “इस बार क्या होगा भगवान भी नहीं जनता” लिहिलं होतं. आता याचा अर्थ काय याबद्दल अनेकांनी अनेक तर्क लावले. १४ दिवसांनी “सेक्रेड गेम्स २”चा ट्रेलर येणार की टीझर येणार की आणखी काही याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in) on

या गोष्टीला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर आज त्या गूढ पोस्टर मागचा अर्थ समजला आहे. नेटफ्लिक्सने आज सेक्रेड गेम्सचे ४ पोस्टर्स लाँच केले आहेत. तशा अर्थाने यांना पोस्टर्स म्हणता येणार नाही कारण हे चारही सेक्रेड गेम्सच्या ४ एपिसोड्सचे टायटल्स आहेत. आता याचा अर्थ “सेक्रेड गेम्स २” मध्ये फक्त ४ एपिसोड्स असतील का ? तर इथे नेटफ्लिक्सने लोकांना नवीन गोंधळात टाकलं आहे. कारण या पोस्टर्स सोबत एक नोट पण आहे : “बोलो अहम् ब्रह्मास्मि। ६ दिन में सब कुछ दिखाई देने लगेगा।“

आता आणखी ६ दिवसांनी काय घडणार याबद्दल आपण सगळेच तर्क लावायला मोकळे आहोत. पण त्या पूर्वी हे ४ पोस्टर्स पाहून घ्या. या पोस्टर्सवरून सेक्रेड गेम्स २ मध्ये काय पाहायला मिळेल याचा अंदाज लागतोय का बघा. तुमचे अंदाज आम्हाला सांगायला विसरू नका भाऊ.

१. बिदाल: गीता

 

२. कथम अस्ति

 

३. अंतर महावन

 

४. उनागमम

तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required