'ला ला लँड' चित्रपटाचा ऑस्करवाल्यांनी केला पोपट !

आज कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थियेटर मध्ये ’८९ व्या ऑस्कर २०१७’ पुरस्कारांची घोषणा झाली. जगभरातल्या सिनेकलाकारांच्या स्वप्नातला सोहळा म्हणजे ऑस्कर. या ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी मिळावी म्हणून अनेक चित्रपट शर्यतीत असतात. ऑस्करच्या शर्यतीत यावर्षी एक नाव प्रकर्षाने घेतले जात होते ते म्हणजे ‘ला ला लँड’ या सिनेमाचे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह एकूण सहा पुरस्कारांवर "ला ला लँड" चित्रपटाने आपलं नाव कोरलं. शेवटच्या पुरस्काराची म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा होत असताना एक मोठा गोंधळ झाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून "ला ला लँड"ची घोषणा झाली आणि टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाची संपूर्ण टीम पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवरसुद्धा आली.  पण तेवढ्यात घोषणेत चूक झाल्याचं जाहीर करत ‘मूनलाईट’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाचा ऑस्कर देण्यात आला.

एका जगप्रसिद्ध पुरस्कार सोहळ्यात अशी चूक होणे हास्यास्पद वाटते. सिनेमाच्या संपूर्ण टीमचा एकप्रकारे पोपट करण्यात आला असेच जगभर बोलले जात आहे. ‘ला ला लँड’ चित्रपटाच्या टीमच्या मनात ‘हात आया मुँह ना लगा’ अशीच भावना असावी. शेवटी काहीही असले तरी यावर्षी याच चित्रपटाने ऑस्कर गाजवला आहे.

या एका चुकीला नजरेआड करत आपण २०१७ च्या संपूर्ण ऑस्कर पुरस्कारांच्या यादीवर एक नजर टाकूया :

सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'मूनलाईट'

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन, ‘ला ला लॅण्ड’साठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अॅफ्लेक, ‘मँचेस्टर बाय द सी’साठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डॅमियन शेझल– ला ला लॅण्ड

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – ला ला लॅण्ड

सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग – ला ला लॅण्ड

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल पटकथा – मँचेस्टर बाय द सी

सर्वोत्कृष्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले – मूनलाईट

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – ला ला लॅण्ड

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – सिंग

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट – द व्हाईट हेल्मेट

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार ‘द जंगल बुक’ सिनेमाला

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनसाठी ‘ला ला लॅण्ड’ला पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म ‘पायपर’

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म ‘झुटोपिया’

सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपट - ‘द सेल्समन’

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मेहर्शाला अली, मूनलाईट सिनेमासाठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - वायोला डेव्हिस, ‘फेन्सेस’ चित्रपटासाठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - ‘हॅक्सॉ रिज’

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - सलवेन बेलमेरला ‘अरायव्हल’साठी

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचनेसाठी ‘सुसाईड स्क्वॉड’च्या टीमला ऑस्कर

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - कॉलिन एटवूड ‘फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम’साठी

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - ‘ओ.जे.: मेड इन अमेरिका’

सबस्क्राईब करा

* indicates required