ऑस्कर जत्रा : हे आहेत यंदाचे ऑस्कर पटकावणारे सर्वोत्कृष्ट सिनेमे !!

ऑस्करची शर्यत आज सकाळी ६.३० वाजता सुरु झाली. यंदाचा ऑस्कर हा ९० वा ऑस्कर सोहळा असल्याने खास होता. यावर्षीचा लक्षणीय चित्रपट ‘शेप ऑफ वॉटर’ ठरलेला असून या सिनेमाने तब्बल १३ नॉमिनेशन्स मिळवले होते. १३ नॉमिनेशन्स मधून ४ प्रमुख पुरस्कारांबर बाजी मारत या सिनेमाने शेवटी सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार सुद्धा खिशात घातला आहे. या खालोखाल डंकर्क सिनेमाला ३ पुरस्कार मिळाले आहेत.

डार्केस्ट अवर या सिनेमाच्या बाबतीत एक विशेष उल्लेख करावासा वाटतो. या सिनेमात विन्स्टन चर्चिल यांची भूमिका साकारणाऱ्या ‘गॅरी ओल्डमन’ यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची भुमिकेसाठी असलेली मेहनत तर याला कारणीभूत आहेच पण याबरोबर गॅरी ओल्डमन चं विन्स्टन चर्चिल मध्ये रुपांतर करताना त्यांचा मेकअप आणि हेअरस्टाईल करणाऱ्या कलाकारांचाही यात मोठा वाटा आहे. त्यांच्या याच कामामुळे त्यांनाही सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषेचा ऑस्कर देण्यात आला आहे.

 

चला तर बघुयात ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण लिस्ट :


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल- थ्री बिलबोर्डस् आऊटसाईड एब्बींग, मिसोरी

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - "डार्केस्ट अवर" - कझुहिरो, मेलिनोस्की, लकी सिबिक

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मार्क ब्रिजेस - फॅन्टम थ्रेड

सर्वोत्कृष्ट फिचर डॉक्युमेन्टरी - इकरस -ब्रायन फोगल, डॅन कोगन यांना पुरस्कार

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - डंकर्क - अॅलेक्स गिबसन, रिचर्ड किंग

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - डंकर्क - ग्रेग वेइंगार्टन, गॅरी ल‌ॅनडेकर ,मार्क रिझो

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर - द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन-सेट डेकोरेशन- द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अ फँन्टास्टिक वुमन -चिले

स्रोत

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जेनी - आय, टोनया

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट - डियर बास्केटबॉल

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा - कोको

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर २०४९

सर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क

स्रोत

सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेन्टरी - हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन 405

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - द सायलेन्ट चाईल्ड

सर्वोत्कृष्ट  अॅडाप्टेड स्क्रिनप्ले - जेम्स आयवरी (कॉल मी बाय युअर नेम)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - जॉर्डन पिल -गेट आऊट

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - रॉजर डिकिन्स -ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट गीत - रिमेम्बर मी -कोको - क्रिस्टन अॅण्डरसन लोपेझ ,रॉबर्ट लोपेझ

सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमन - डार्केस्ट अवर

गॅरी ओल्डमन 'विन्स्टन चर्चिल यांच्या भूमिकेत (स्रोत)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडॉरमेन्ट - थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गिलेरमो डेल टोरो -द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट सिनेमा- द शेप ऑफ वॉटर

स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required