ही आहे तरूणाईची नवीन क्रश!! सोशल मिडीयाला वेड लावणारी ही तरूणी आहे तरी कोण ??

मंडळी, फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर जागृतावस्थेत असाल तर तुम्ही हा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहिला नाही असं होणार नाही. आणि नसेल पाहिला तरी इथं पाहून घ्या... (ज्यांनी आधीच पाहिलाय तेही परत परत पाहात असतीलच!)

काय ? कशा आहेत 'एक्स्प्रेशन्स' ?? अगदी घायाळ झालात ना ? होणारच ! ऐन वॅलेन्टाईन्सच्या आठवड्यात सोशल मिडीयावर ही लहानशी सुंदर क्लिप धुमाकूळ घालतीये. जो तो या व्हिडीओच्या, अर्थातच या तरुणीच्या अदाकारीवर फिदा आहे. डोळ्यांच्या सुंदर हावभावांतून व्यक्त केल्या गेलेल्या या प्रेमावर लाईक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय !

एकंदरीत सद्या सोशल मिडीयावरती या व्हिडीओसोबतच या तरूणीलाही तुफान लोकप्रियता मिळतेय.

स्रोत

व्हिडीओमध्ये दिसणार्‍या या अभिनेत्रीचं नाव आहे 'प्रिया प्रकाश वारियर'. आणि व्हायरल झालेली ही क्लिप 'माणिक्य मलरया पूवी' या गाण्यातली आहे. 'उरू अदार लव' नावाच्या आगामी मल्याळम चित्रपटातलं हे गाणं असून याच चित्रपटातून ती पदार्पण करतीये ! शाळेतल्या किशोरवयीन प्रेमकथेवर आधारीत हा चित्रपट आहे.

तर मंडळी, व्हीडीओवर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ? कमेन्ट करून नक्की सांगा...

सबस्क्राईब करा

* indicates required