सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतोय प्रियांकाचा ड्रेस : पाहा काही मजेदार प्रतिक्रिया!!

Subscribe to Bobhata

प्रियांका चोप्रा भारतीय असली तरी ती भारतात थोडीच असते? ती आता अमेरिकेतच रूळलीय. तीच्या कामाला, अभिनयाला तिथं दाद मिळतेय. तिच्या फॅशनच्या चर्चा तिकडेही होतात आणि इकडेही.

तर मंडळी, सोमवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेटा गालाच्या रेड कार्पेटवर प्रियांका अवतरली. अवतरली ते अवतरली, सगळ्या मीडियावरही झळकली. कारण तेच होतं, तिनं परिधान केलेला हटके ड्रेस. डिझायनर रॉल्फ लॉरेन यांनी डिझाईन केलेला हा बॉलगाउन होता, ज्याचं पाठीमागचं कापड भलतंच लांब होतं. एवढं लांब की ते सांभाळायलाच दोन माणसं ठेवली होती. लोकांनी या ड्रेसला झाडू, पडदा, तंबू, अशा अनेक हास्यास्पद उपाध्या देऊन त्या पाश्चात्य फॅशनचा उध्दार केला. कोणीतरी "एवढ्या खाकी कापडात अख्ख्या शाखेच्या चड्ड्या शिवून झाल्या असत्या." असंही म्हणालं. ट्विटरवर वायरल झालेल्या काही गंमतीदार प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मंडपाचं कापड

गजनीमधलं वाळवंट

स्वच्छ भारत अभियान

अंगात डगला आणि कंबरंला पट्टा, हवालदारीन तुम्हां कशी वाटली.. 

ताडपत्री

पण लोकांच्या या टवाळकीलाही प्रियांकाने सकारात्मक घेतलेलं दिसतंय. तिने स्वतःही एक फेसबुक पोस्ट शेअर केलीय.

सबस्क्राईब करा

* indicates required