'काकू मला वाचवा' - या ट्विट ने ट्विटर हादरलं !!

सुषमा स्वराज यांनी एकदा एका ट्विटर युजरला उत्तर देताना म्हटलं होतं की, "तुम्ही मंगळावर जरी अडकलात तरी आम्ही तुम्हाला मदत करू". म्हणजे काय तर तुम्ही कुठेही अडकलात तरी भारताचे परराष्ट्र खाते तुम्हाला सोडवून आणेल.  आता ही वेगळी गोष्ट आहे की हा पाकिस्तानला टोला होता.

मंडळी, कदाचित हा दिलासा बघूनच एका ट्विटर युजरने मागच्याच आठवड्यात सुषमा स्वराज यांना ट्विटरवर एक मोठी मदत मागितली. या युजरने केलेलं ट्विट सध्या व्हायरल झालेलं आहे.

तर झालं असं की विशाल सूर्यवंशी हा पुण्यातल्या एका थेटरात ‘जब हॅरी मेट सेजल’ हा शाहरुखचा सिनेमा बघण्यासाठी गेला आणि दुर्दैव म्हणजे सिनेमा इतका रटाळ निघाला की त्याने थेट सुषमा स्वराज यांनाच ट्विट करून मदत मागितली. “मी पुणे हिंजवडी मध्ये ‘जब हॅरी मेट सेजल’ बघत आहे...कृपया मला लवकरात लवकर वाचवा” हा त्याचा ट्विट. या नंतर मात्र ट्विटर मोठाच हशा पिकला.

मंडळी शाहरुख खान आणि अनुष्का शर्माचा “JHMS” सिनेमा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः तोंडावर आपटला. राव, शाहरुख़चे फॅनसुद्धा हे नाकारू शकत नाही की सिनेमा एकदम टुकार होता. पण विशालचं ट्विट मात्र सुपर हिट झालं. सुषमा स्वराज यांनी अजून तरी यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही पण ट्विटरवर इतरांच्या प्रतिक्रियांचा पाऊस आला आहे त्यावर एक नजर टाकू :

.

जेव्हा हॅरी सेजलला भेटतो

सिनेमा पेक्षा हे ट्रोल्स भारी हायत राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required