तर या कामात बिझी आहे सैराटवाली आर्ची !! 

          नागराज मंजुळेंचा सैराट आठवतोय का? त्यातले आर्ची-परश्या आठवतात का? अरे हो! आठवण्यासाठी विसरायलाही लागतं नाही का? प्रत्येकाच्या मनाला भिडलेला हा अविस्मरणीय चित्रपट, आणि चित्रपटाचं मुख्य आकर्षण म्हणजे रिंकू राजगुरू. पण बेफाम प्रसिद्धीच्या झोतात आलेली रिंकू मध्येच गायब कुठं झाली बरं? 

            ती बिझी होती शूटींग मध्ये. हो, रिंकू परत येतेय. येत्या ९ फेब्रुवारीला सैराटचा कन्नड रिमेक येतोय. आणि यात आपल्याला आर्चीच्या भूमिकेत परत एकदा रिंकू राजगुरूच दिसणार आहे. रॉकलाईन व्यंकटेश या निर्मिती संस्थेकडून या चित्रपटाची निर्मिती होतेय. इथे या चित्रपटाचं नाव आहे 'मनसु मल्लीगे'. रिंकूनं आता या चित्रपटाचं शूट पूर्ण केलंय. आणि सध्या ती तीच्या दहावीच्या परीक्षेची तयारी करतेय. 

           या कन्नड सैराटमध्ये रिंकू सोबत परश्याच्या भूमिकेत कन्नड अभिनेता निशांत दिसेल. निशांत हा अभिनेते सत्या प्रकाश यांचा मुलगा आहे. सैराटची लोकप्रियता पाहून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननेही सैराटच्या हिंदी रिमेकचे हक्क विकत घेतल्याची आणि नागराजने ते नाकारल्याची अशा दोन्ही बातम्या चर्चेत आहेत.

 या सैराटच्या रिमेकमध्ये काय काय मजेदार आहे ते पहायला आता आम्हीही उत्सुक झालोय....