रॉक-पेपर-सिझर्स या खेळात जिंकायचंय ?
शाळेत जाण्याच्या दिवसात आपण सगळेजण रॉक-पेपर-सिझर्स हा खेळ खेळत होतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी हा खेळ वाघ -माणूस -बंदूक असाही खेळला जातो. काही वेळा आपण जिंकतो तर काही वेळा अर्थातच हरतो आणि हसत-खेळत जिंकण्या-हरण्याला आपण विसरूनही जातो. मनोवैज्ञानीक अशा खेळांचा फार बारकाईने अभ्यास करतात आणि काही वेळा त्यांचे निष्कर्ष मानवी मनोव्यापाराचे दडलेले लपले कंगोरे समोर आणतात. उदाहरणार्थ रॉक हा पर्याय जास्तीत जास्त वापरला जातो. पेपर हा पर्याय वापरला तर जिंकण्याची शक्यता जास्त असते.परंतु सगळ्यात महत्वाचे निरिक्षण असे की खेळताना एकदा हरल्यानंतर निर्णयक्षमता उतरणीस लागते आणि तोच तोच पर्याय वापरण्याची वारंवारता पण वाढत जाते.
ते काही असो रॉक-पेपर-सिझर्स म्हटल्यावर आठवण होते डॉ. शेल्डन कूपरचीच.




