सलमान खान दाखवतोय डिस्ट्रेस्ड जीन्स घालण्याचा आणखी एक फायदा

मंडळी, आजकाल  झाडून सगळे सेलेब्रिटी डिस्ट्रेस्ड म्हणजे फाटलेल्या जीन्स घालताना दिसतात. काय एक एक दळभद्री लक्षणं असतात नाहीतर काय?

तर  फॅशन म्हणून तर ठीक आहे, पण या  फाटअक्या जीन्सचा आणखी एक उपयोग आपल्याला सलमान खान दाखवतोय. म्हणजे कसं, आपण कशाची तरी वाट पाहात असतो.. कंटाळा येतो.. मग आपण काय करतो, तर नखं चावतो, मोबाईल चेक करतो, येणार्‍याजाणार्‍यांकडे विनाकारण बघत बसतो, उगीचच आजूबाजूचे लोक काय बोलताहेत हे ऐकत बसतो.. पण माहिती आहे सलमान काय करतो?

 

सलमान  आपल्या डिस्ट्रेस्ड  जीन्सचे धागे तोडून चावत बसतो. एकदा डाव्या पायावरचा धागा तोडतो, तर एकदा उजव्या पायावरचा. ही क्लिप लहान आहे, प्रत्यक्षात त्यानं किती धागे तोडले कुणास ठाऊक?

 नशीब डिस्ट्रेस्ड स्वेटर्सची अजून फॅशन नाही. नाहीतर हा शहाणा धागे तोडत तोडत  पूर्ण  स्वेटरच उसवायचा..

मग मंडळी, कळाला ना आणखी एक उपयोग  डिस्ट्रेस्ड जीन्स घालण्याचा?

सबस्क्राईब करा

* indicates required