२०१८ ची दमदार सुरुवात करून देणार 'ये रे ये रे पैसा'...लवकर टीझर पाहून घ्या राव !!

आतापर्यंत आपण ये रे ये रे पावसा म्हणायचो. पण आता ‘ये रे ये रे पैसा’ म्हणावं लागेल असं दिसतंय.. कारण संजय जाधव घेऊन आले आहेत त्यांचा नवीन फ्रेश सिनेमा, ‘ये रे ये रे पैसा’. मंडळी, सिनेमा रिलीज होतोय ५ जानेवारी २०१८ ला. म्हणजे २०१८ ची मस्त सुरुवात या सिनेमाने होणार असं दिसतंय.

कलाकार कोण असतील ?

उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी!!

सिनेमात काय आहे ? 

या सिनेमात आहे चिंचपोकळीचा हृतिक रोशन, लक्ष्मी रोडची दीपिका पदुकोणला आणि तीन हात नाक्याच्या शाहरुख खान. विश्वास बसत नसेल तर टीझर पहा.

सिनेमात नक्की काय असेल हे एकंदरीत थोडं बुचकळ्यात पडणारं आहे. पण एकंदरीत धम्माल कॉमेडी असेल असं दिसतंय. बऱ्याच वर्षानंतर ‘झी स्टुडीओ’ आणि संजय जाधव एकत्र काम करत आहेत त्यामुळे सिनेमा चांगला असणार अशी खात्री वाटत आहे.

संजय जाधव म्हटलं की सिनेमात स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर असणारच हे जे गणित होतं, ते आता कुठेतरी बदललेलं दिसत आहे!! नवीन स्टारकास्ट, नवीन विषय आणि नवीन वर्ष जुळून आलं आणखी काय हवं राव !!

एकूण काय,  तर सिनेमा २०१८ची ट्रिट घेऊन आला आहे असं म्हणायला हरकत नाही!! 

बोभाटाने केलेलं विशेष निरीक्षण:

मंडळी, या सिनेमाची एक खास बात म्हणजे संजय जाधव साहेबांनी बऱ्याच दिवसानंतर सिनेमाला ‘मराठी’ नाव दिलं आहे.

मंडळी तुम्ही टीझर तर बघितलाच.  पण आता या सिनेमातील गाणंही बघा.. ए वाजव रे !!!

सबस्क्राईब करा

* indicates required