या एप्रिलमध्ये येतोय सुजित सरकारचा 'ऑक्टोबर'...हा ट्रेलर तुम्ही पाहायलाच हवा !!

Subscribe to Bobhata

सुजित सरकार या दिग्दर्शकाचा बहुचर्चित सिनेमा “ऑक्टोबर” १३ एप्रिल रोजी रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय.

सुजित सरकारची आपल्यातील अनेकांना फारशी ओळख नसेल असं होणार नाही. तरीही तुम्हांला आठवत नसेल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या काही सिनेमांची नावे सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो कसा दिग्दर्शक आहे.. विकी डोनर, मद्रास कॅफे आणि पिकू हे त्याचे प्रमुख सिनेमे आणि गेल्या वर्षी आलेल्या ‘पिंक’ चा तो लेखक आणि निर्माता देखील होता. त्याचे हे आधीचे सिनेमे त्याच्या वेगळ्या विषयाच्या निवडीमुळे आणि अप्रतिम दिग्दर्शनामुळे बॉलीवूडवर त्याचा एक वेगळा ठसा उमटवून गेले. "ऑक्टोबर"मध्ये त्याने एक नवीन प्रयोग केलाय हे या सिनेमाच्या ट्रेलर वरूनच दिसतं.

सुजित सरकार (स्रोत)

“ऑक्टोबर” च्या बाबतीत बोलायला गेलं तर त्याने जेव्हा मुख्य भूमिकेसाठी वरूण धवन आणि नवीन पदार्पण करणारी अभिनेत्री “बनिता संधू” हिची निवड केली तेव्हापासूनच चित्रपटाची चर्चा सुरु झाली. म्हणायला गेलं तर ही एक प्रेम कथा आहे.  पण याची दुसरी बाजू बघितली तर यात बॉलीवूडच्या पठडीतलं गोडगोड प्रेम दिसत नाही. सुजित सरकार त्याचा विषय अगदी खोलात जाऊन तपासून बघतो, तसाच काहीसा प्रकार "ऑक्टोबर"मध्ये दिसणार आहे.

१३ एप्रिलला अजून बरोबर एक महिना बाकी आहे मंडळी. त्याआधी या सिनेमाचा ट्रेलर बघून घ्या आणि तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required