सनी लियोन बनली आई : कुठे कौतुक, तर कुठे नाराजीचा सूर...

मंडळी, ऐकलंत ना? बॉलीवूडची बेबी डॉल आता आई बनलीय!! हो. पण तुम्ही लगेच अवाक होऊ नका, सनीने हे मूल दत्तक घेतलंय. 

याआधी जेव्हा सनीला आपल्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तिनं "मला मूल हवंय.. पण प्रेग्नन्सी नको," असं काहीसं विचित्र उत्तर देऊन आपण कामामध्ये अत्यंत व्यग्र असल्याचं कारण पुढे केलं होतं. पण अचानक एका मुलीला दत्तक घेऊन सनीने आपल्या चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलंय. विशेष म्हणजे सनी आणि तिचा पती डॅनीयल वेबरने दत्तक घेतलेली ही मुलगी लातूरची आहे. ती २१ महिन्यांची आहे आणि तिचं  नाव आता निशा कौर वेबर असं असेल. सोशल मिडीयावर पती आणि मुलीसोबत सनीने आपला फोटो पोस्ट केलाय.

 

स्त्रोत : Facebook

 

मूल दत्तक घेणारी सनी लियोन ही बॉलीवूडमध्ये पहिलीच नाही मंडळी. याआधीही रवीना टंडन, सुष्मीता सेन, प्रिती झिंटा यांनीही मुलं दत्तक घेतली आहेत. आता सनीचीही या यादीत भर पडली आहे. फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांकडून तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा भरपूर वर्षाव होतोय. 

पण अनेक सज्जनांनी सनीच्या भूतकाळाला या मुलीच्या भवितव्याशी जोडून तिच्यावर टीकाही सुरू केलीय. असो, एका अनाथ मुलीच्या आयुष्याला मायेचं छत्र दिल्याबद्दल आमच्याकडूनही सनीचे अभिनंदन आणि विशेष आभार!!

सबस्क्राईब करा

* indicates required