तारक मेहता का उलटा चश्माचे ‘जनक’ तारक मेहता यांचे निधन !!!

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे जनक ‘पद्मश्री तारक मेहता’ याचं आज सकाळीच निधन झालं. ते ८७ वर्षाचे होते. ‘‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि त्यांच्या अनोख्या विनोदी लेखनशैलीसाठी ते ओळखले जातात. याच सदराचे रुपांतर पुढे ‘सब’ वाहिनी वरील मालिकेत झाले. यातील पात्र आणि विनोदी पद्धतीने मांडलेल्या दैनंदिन गोष्टी प्रेक्षकांनी उचलून धरल्या.

‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ ही त्यांची गुजराती भाषेतील पुस्तकेही खूप गाजली. आज पर्यंत त्यांची 80 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. २०१५ साली त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहतांचे योगदान फार महत्वाचे आहे.

तारक मेहतांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.

अश्या संवेदनशील लेखक, नाटककाराला बोभाटाची श्रद्धांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required