सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणारे बॉलीवूडचे १० स्टार्स!!!

मार्च संपत आलाय आणि टॅक्स भरण्यासाठी लोकांची पळापळ सुरु आहे.  यात आपले फिल्मस्टार्स कसे मागे राहतील? सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या बॉलीवूडच्या कलाकारांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि आपला बॉलीवूडचा भाईजान सलमान या सर्वात आघाडीवर आहे.

कॉफी विथ करन मध्ये तुम्ही ऐकलं असेलच की अक्षयकुमारकडे अवॉर्ड्स नाहीत पण पैसा मात्र भरपूर आहे. पण यावर्षी त्याचं उत्पन्न थोडं कमी झालेलं दिसतंय. सलमान खानने अक्षय कुमारला मागे टाकलंय आणि  यावर्षी तब्बल ४४.५ करोड रुपयाचा टॅक्स भरलाय. 

दुसऱ्या क्रमांकावर बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमार आहे. त्याने यावर्षी २९.५ करोडचा टॅक्स भरला आहे. गेल्यावर्षी अक्की टॅक्स भरण्यात बॉलीवूडमध्ये टॉपला होता.

अक्षय पाठोपाठ हृतिक रोशन २५.५ करोड भरून तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे तर कपिल शर्मा २३.९ कोटी भरून चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणारा स्टार ठरलाय. कपिलनं गेल्या वर्षी फक्त ७ कोटी टॅक्स भरला होता.  याउलट यावर्षीची आकडेवारी आश्चर्यकरक रित्या वाढली आहे.

या लिस्ट मध्ये आणखीही नवे आहेत...कोणती ? चला पाहूया...

 

1. सलमान खान 44.5 कोटी

2. अक्षय कुमार - 29.5 कोटी

3. हृतिक रोशन - 25.5 कोटी

4. कपिल शर्मा - 23.9 कोटी

5. रणबीर कपूर - 16.5 कोटी

6. आमिर खान - 14.8 कोटी

7. करण जोहर - 11.7 कोटी

8. दीपिका पदुकोण - 10.25 कोटी

9. आलिया भट्ट - 4.3 कोटी

10. करीना कपूर खान - 3.9 कोटी

अंहं, बायका टॅक्स चोरत नाहीत, तर त्यांना पुरूष ऍक्टर्सच्या तुलनेत खूप कमी मानधन मिळतं. त्यामुळं त्यांचा टॅक्सही कमी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required